Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनादरम्यान विविध विषयावर शासनाचे वेधले लक्ष

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 March 2025, 13:30

पुणे : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दौंड तालुक्याचे आमदार ऍड राहुल कुल यांनी नियम 293 अन्वये विविध विषयावर शासनाचे लक्ष वेधून घेतल आहे.राज्यातील नदीजोड प्रकल्पाची कामे तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे, मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळविणेसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारून पाणी वळविणे संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, तसेच राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण असलेले प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या सहाय्याने पूर्ण करावेत व जलयुक्त शिवार टप्पा २ अंतर्गत कामांना गती देण्यात यावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.

 

दरम्यान शेतकरी सुखी तर राज्य सुखी या विचाराने काम करणाऱ्या केंद्र सरकारचे आमदार राहुल कुल यांनी अभिनंदन केले आहे. ऊस आणि कांदा या पिकाच्या बाजारभावाच्या बाबतीत दर नियंत्रणात नसल्याने ग्राहक व शेतकऱ्यांना नेहमी तोटा सहान करावा लागत आहे, त्यामुळे सुवर्णमध्य साधून निर्यात आयातीची धोरणे ठरविण्यात यावीत. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणे शक्य आहे. साखरेचा ८० टक्के वापर हा औद्योगिक कारणासाठी केला जातो तर फक्त २० टक्के वापर हा खाण्यासाठी केला जातो त्यामुळे २० टक्के वापर वगळून इतर ठिकाणी साखरेची दरवाढ केली तर शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील चांगला बाजारभाव मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

एमडी या अमली पदार्थांचे निर्मिती करणारे दोन कारखान्यांच्या माध्यमातून कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात उत्पादन सुरू होते. त्यावर कारवाई झाली असली तरी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत या अमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात कटिंग पानच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री होत आहे त्यावर निर्बंध आणले नाहीत तर तरुणाई मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जाईल त्यामुळे याबाबत शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.

मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री हे उपाययोजना करीत आहे. परंतू होणारे नुकसान व भरपाई यामध्ये मोठी तफावत आहे. प्रामाणिकपणे काबाड कष्ट करून बँक व पतसंस्थामधे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवणाऱ्या नागरिकांचे पैसे देखील सुरक्षित राहिलेले नाहीत. रूपी बँक ते ज्ञानराधापतसंस्था अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. यासंदर्भात अडकलेल्या ठेवीदारांच्या बाबतीत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.

कुरकुंभ, ता. दौंड येथील औद्योगिक क्षेत्रात मागील दोन वर्षापासून छोटे मोठे २५ हून अधिक गंभीर अपघात घडलेले आहेत, राज्यभरात मागील दोन वर्षात हजारो कामगारांचा औद्योगिक अपघातात मृत्यू झाला आहे. कामगार जखमी होण्याचे प्रमाण देखील खूप मोठे आहे. औद्योगिक प्रदूषणात वाढ होत आहे. राज्यातील १२५०० छोट्या मोठ्या उद्योगांवर शासनाने कारवाई केली असली तरी शासनाच्या अधिकाऱ्यांची असलेली नकारात्मक भूमिका व त्यामुळे वाढलेले हे अपघाताचे प्रमाण यावर लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली

राज्य सरकारने वेगवेगळ्या समाजबांधवाच्या उन्नतीसाठी १८ आर्थिक विकास महामंडळे मागील कालावधीत सुरू केली आहे. त्याना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून या सर्व समाज बांधवांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली. प्रांत व तहसीलदार यांच्या स्थानिक चौकशीच्या (स्पॉट पंचनामा) आधारे भिल्ल, वडारी, डवरी, रामोशी या सारख्या भटक्या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे, त्याच प्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याची प्रक्रिया देखील सोपी करून देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.

पुण्यात वाहतुकीची मोठी कोंडी आहे त्यामुळे रुग्णांना वेळेत हॉस्पिटल मध्ये पोहचवता येईल कि नाही याची शाश्वती राहिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ज्याप्रमाणे कोस्टल रोड, अटल सेतू, मिसिंग लिंक अशी विकास कामे केली त्याच धर्तीवर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे रिंग रोड, पुणे नगर उन्नत मार्ग, पुणे सोलापूर इलीव्हेटेड मार्ग असे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत अशी मागणी केली. महाराष्ट्रातील सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) दर जिल्हानुसार बदलतात ते समान करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35
Next Post
nine people injured in pick up accident Uruli Kanchan pune

Uruli Kanchan News : शिंदवणे येथे भाविकांना घेऊन जाणारे पिकअप झाले पलटी; तीन जण गंभीर, तर सहा जण किरकोळ जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.