नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Crime News) शहरातून एक अत्यंत (Nashik News) संतापजनक आणि (Malegaon News) धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीवर एका 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करण्यात आला आहे. या निंदनीय घटनेमुळे मालेगाव शहर हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे आणि त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील पीडित मुलगी ही 13 वर्षांची असून ती मतिमंद आहे. दीपक धनराज छाजेड (55) नावाच्या संशयित आरोपीने या अल्पवयीन मुलीला फूस लावली. त्यानंतर आरोपीने तिला त्याच्या स्कूटीवर बसवून शहरातील एका पडित जागेवर नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी दीपक छाजेड याच्या विरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. या प्रकरणाची आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मालेगाव शहरात संतापाची लाट पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







