Pune Crime: पुण्यात रविवारी एका आरोपीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी आलेल्या एका आरोपीने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवले. या घटनेनंतर पुलगेट परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 नोव्हेंबर रविवारी घडली. सुमारे साडेचारच्या सुमारास आरोपीने उडी मारून आत्महत्या केली.. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. समीर हमीद शेख असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती अस्थिर झाली. अशातच त्याने कृषी महामंडळाच्या इमारतीवरून उडी मारली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर घटनेच्या दिवशी नशा करून आला होता. नशेतच त्याने आत्महत्या केली. समीर सतत आत्महत्येचा प्रयत्न करत होता. त्याला मानसिक त्रास होता असल्याने तो असे पाऊलं उचल होता. रविवारी देखील त्याने पुलगेट चौकाजवळ उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पोलिसांनी त्याला वेळी वाचवून समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर समुपदेशन सुरु असताना, त्याने कृषी महामंडळाच्या इमारतीवरून उडी मारली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीत, समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. अनेक कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल होते. उडी मारल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांनी त्यांच्या पत्नीस दिली.







