Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BMC Election : मोठी बातमी : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या तारखेबाबत मोठी अपडेट! काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार? वाचा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 December 2025, 12:21
BMC Election

photo- social media

BMC Election : नगर परिषद निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बहुप्रतिक्षित महापालिका (Municipal Corporation) आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई (Mumbai), ठाण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले असून, आता या निवडणुकांच्या तारखांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

 

राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, अधिवेशन संपल्यानंतर १५ डिसेंबरनंतर कधीही महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबतच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल. विशेष म्हणजे, आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

महापालिका निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत आणि याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया केवळ ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. २०१७ मध्ये घोषणा आणि मतदानात दोन महिन्यांचे अंतर होते, परंतु यावेळी प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. निवडणूक आयोग १४ किंवा १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान असल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, हा अनुभव टाळण्यासाठी हे दिवस निवडले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही मुंबई महापालिकेची (BMC Election) होणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेचे मैदान राखण्याचे मोठे आव्हान आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन ‘ठाकरे बंधू विरुद्ध महायुती’ अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि चंद्रपूर वगळता उर्वरित २७ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आधीच मोकळा झाला असल्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत, त्यामुळे पुढील आठवड्यात आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Loni Kalbhor News: मारहाणीच्या गुन्ह्यातील 8 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.