Thursday, August 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

DJचा दणदणाट महागात पडला! बारामती पोलिसांची धडक कारवाई; 25 जणांवर गुन्हे, DJ साहित्य अन् वाहन जप्त, मालक -चालकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 8:32

पुणे : उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश आवाजात DJ वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच पोलिसांच्या कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत DJ व Sound System च्या अनियंत्रित वापरासंदर्भात तीन स्वतंत्र प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत आंबेडकर जयंती मिरवणुकीतील नियमभंगप्रकरणी 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीतील प्रकरणात वाहनासह संपूर्ण DJ Sound System जप्त करण्यात आले आहे. ईद-ए-मिलाद मिरवणुकीत प्रतिबंधात्मक नोटीस व प्रत्यक्ष सूचना देऊनही आदेशाचे पालन न करणाऱ्या 17 डीजे मालक-चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती शहरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक मिरवणुका शांततेत आणि सामाजिक सलोखा राखत पार पडाव्यात, नागरिकांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आंबेडकर जयंती मिरवणुकीत 25 जणांविरुद्ध गुन्हा

 

13 एप्रिल रोजी सायंकाळी शिवाजी चौक, इंदापूर चौक, एस.टी. स्टँड परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या वेळी मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टिम वाजविल्याने सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊन नागरिकांना त्रास तसेच मानवी आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 143/2026 भारतीय न्याय संहिता कलम 223 (अ) व 223 (ब) अन्वये 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची फिर्याद पोलीस अंमलदार राहुल कल्याण वाघ यांनी दिली आहे.

अण्णाभाऊ साठे जयंतीत वाहनासह DJ जप्त

2 ऑगस्ट रोजी गुणवडी येथील ड्रायव्हर गल्ली परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात DJ वाजविल्याचा प्रकार घडला. DJ चा आवाज कमी करण्यास सांगितल्यावर वाद होऊन फिर्यादीस मारहाण केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी गु.र.नं. 308/2026अन्वये मोटार वाहन अधिनियम, Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पांढऱ्या रंगाचे टाटा कॅरियर वाहन क्रमांक MH-20-EG-5351 आणि त्यावर बसविण्यात आलेले DJ Sound System, Speakers, Bass Boxes, Amplifiers, Mixer, Wiring व अन्य ध्वनिवर्धक साहित्य पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. वाहनातील alteration/modification, फिटनेस प्रमाणपत्र, परवाना आणि प्रत्यक्ष वापराबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्यामार्फत पुढील तपासणी व कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

नोटीस देऊनही आदेशाचे पालन नाही; 17 जणांवर गुन्हा

26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी DJ मालक व चालकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. धार्मिक किंवा संवेदनशील ठिकाणांसमोर जाणीवपूर्वक आवाज वाढवू नये, मिरवणूक थांबवून DJ वाजवू नये, चिथावणीखोर गाणी अथवा ऑडिओ प्रसारित करू नयेत, ध्वनीमर्यादेचे पालन करावे तसेच पोलिसांनी DJ बंद करण्यास सांगितल्यास तात्काळ आदेशाचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, मिरवणुकीदरम्यान प्रत्यक्ष पोलिसांनी DJ बंद करण्याचे निर्देश देऊनही त्याचे पालन न केल्याच्या आरोपावरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 346/2026भारतीय न्याय संहिता कलम 223अन्वये 17 DJ मालक-चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित DJ मालक, चालक व Sound System ची स्वतंत्र ओळख, नोटीस बजावणी, घटनास्थळी दिलेल्या सूचना, CCTV, फोटो, व्हिडिओ, ई-साक्ष्य व अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेले DJ Sound System, Speakers, Bass Units, Amplifiers, Mixers, Controllers, Power Supply Equipment व अन्य साहित्य गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार ते मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

DJ मालक, चालक, ऑपरेटर आणि आयोजकांनाही इशारा

DJ Sound System केवळ भाड्याने दिले, दुसऱ्या व्यक्तीने ते चालविले किंवा आयोजकाच्या सांगण्यावरून Sound System सुरू ठेवले, एवढ्यामुळे संबंधित व्यक्तीची कायदेशीर जबाबदारी संपत नाही. प्रत्येक प्रकरणात संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष भूमिका, नियंत्रण, आदेशाची माहिती, आदेशाचे पालन किंवा अवज्ञा आणि उपलब्ध पुरावे यांचा स्वतंत्रपणे विचार करून कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

ढोल-ताशा, लेझीमला प्रोत्साहन

कर्णकर्कश DJ च्या स्पर्धेपेक्षा महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्यसंस्कृतीला प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ढोल-ताशा, लेझीम, झांज, हलगी आणि इतर पारंपरिक वाद्यांचा शिस्तबद्ध वापर करून उत्सव साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पारंपरिक वाद्यांच्या सामूहिक सरावामुळे युवकांमध्ये शिस्त, समन्वय, संघभावना आणि सामाजिक सहभाग वाढण्यास मदत होते. त्यामुळे उत्सवातील ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवून सामाजिक संदेश, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, वाहतूक सुरक्षा, महिला सुरक्षा आणि सामाजिक ऐक्य यांसारख्या विषयांनाही मिरवणुकांमध्ये स्थान देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणत्याही धर्म किंवा समाजाविरुद्ध कारवाई नाही

DJ वरील कारवाई कोणत्याही धर्म, समाज किंवा उत्सवाविरुद्ध नसून कर्णकर्कश आवाज, कायदेशीर आदेशाची अवज्ञा आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांविरुद्ध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

वृद्ध नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या शांततेचा व आरोग्याचा विचार करून उत्सव साजरे करावेत. पारंपरिक वाद्यांचा वापर करतानाही ध्वनीची कायदेशीर मर्यादा व वेळेची मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने नोटीस बजावणी, बंदोबस्त, प्रत्यक्ष सूचना, पुरावे संकलन, गुन्हे दाखल करणे, वाहन व DJ साहित्य जप्त करणे आणि पुढील तपासाची कार्यवाही केली.

“उत्सवात ऊर्जा असावी; उन्माद नसावा. आवाज असावा; मात्र नागरिकांना त्रास नसावा. कायद्याचे पालन करूनच उत्सव साजरा करा. कायद्यापेक्षा DJ मोठा नाही,” असा स्पष्ट संदेश बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; एक जिवंत काडतूस जप्त

Thursday, 27 August 2026, 9:44

केतन अग्रवाल हत्याकांडातील सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या आरोपांनी खळबळ, चौकशीची मागणी

Thursday, 27 August 2026, 9:35

ऑनलाइन मैत्री ठरली जीवघेणी!पुण्यातील तरुणीला डांबून ठेवून अत्याचार; देहविक्रीच्या दलदलीत ढकलल्याचा आरोप

Thursday, 27 August 2026, 9:01

DJचा दणदणाट महागात पडला! बारामती पोलिसांची धडक कारवाई; 25 जणांवर गुन्हे, DJ साहित्य अन् वाहन जप्त, मालक -चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 27 August 2026, 8:32

महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार? मध्य महाराष्ट्र -मराठवाड्यासाठी हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट!

Thursday, 27 August 2026, 8:03

प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद अन् पंचायत समिती सदस्य निवडीला हिरवा कंदील; GR जारी

Thursday, 27 August 2026, 7:41
Next Post

ऑनलाइन मैत्री ठरली जीवघेणी!पुण्यातील तरुणीला डांबून ठेवून अत्याचार; देहविक्रीच्या दलदलीत ढकलल्याचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp