Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यात एनडीएने आपली आघाडी कायम राखली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, निवडणुकीचे वातावरण तापत असताना, RJD नेत्यांकडून गंभीर वक्तव्ये केली जात आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, बिहार प्रशासनाने दक्षता बाळगत सुरक्षा वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. (Bihar Election 2025)

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलिस दल (Bihar Election Result 2025)
समोर आलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या आघाडीनंतर समर्थक आणि विरोध कांकडूनही संभाव्य प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. निवास्थानाच्या प्रवेशद्वारांवर देखरेख वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
राज्यात राजकीय तणाव वाढला आहे, राजद नेत्यांनी मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मतमोजणीत हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नेत्यांच्या गंभीर वक्तव्यांमुळे वातावरण आणखी तापले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुरतीचं मर्यादित ण ठेवता राजधानी पाटण्याच्या संवेदनशील भागातही पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.







