Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bangalore : रात्रीची वेळ, मोबाईलमध्ये फक्त ६% चार्जिंग; चेन तुटली, ‘ती’ घाबरली, ‘तीने’ सांगितला रॅपिडो रायडरसोबतचा अनुभव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 19:31
Bangalore

Photo- ppn

Bangalore : बंगळुरू (Bangalore) शहरात रात्री पावणे बाराच्या सुमारास एक घटना घडली. एक तरुणीने रात्री ११: ४५ च्या सुमारास घरी जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक केली. तिला आहे त्या अंतरावरुन तब्बल ३८ किलोमीटरचा प्रवास करायचा होता. आशा माने असं या मुलीचं नावं आहे. तिने तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन तिचा त्या रात्री घडलेल्या घटनेचा अनुभव सांगितला आहे.

 

‘त्या’ रात्री काय घडलं होतं?

आशा माने हीने घरी जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक केली.  पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेला रॅपिडो कॅप्टन लोकेशनच्या ठिकाणी पोहोचला. आशा म्हणाली, “मला लवकर घरी पोहोचायचं आहे.” रायडरने हसून उत्तर दिले, “नक्कीच, मॅडम, काळजी करू नका” आणि प्रवास सुरू झाला. पण काही किलोमीटर प्रवास झाल्यावर रस्त्याच्या एका निर्जन आणि अंधाऱ्या टप्प्यावर अचानक बाईकची चेन तुटली आणि बाईक थांबली. आजुबाजूला रस्त्यावर कोणीच नव्हते, फोनमध्ये फक्त ६% बॅटरी शिल्लक होती आणि सगळीकडे अंधार पसरला होता. कोणताही मुलगी या क्षणी जशी घाबरून जाईल, तशी आशाही घाबरली. तिला वाटले की, आता रायडर राईड कॅन्सल करेल आणि या भयानक अंधारात ती एकटी पडेल. ती भेदारलेल्या अवस्थेत असताना तिला रायडरने धिर देत. तिला विश्वास पटवून दिला की तिच्या सोबत काही वाईट घडणार नाही. तो आशाला म्हणाला, “काळजी करू नकोस, आपण हे दुरुस्त करू. मी तुला घरी सोडतो.” यानंतर, रायडरने रस्त्याच्या कडेला बसून, चेन दुरुस्त करायला सुरुवात केली. आशाने तिच्या फोनचा टॉर्च चालू केला. या अवघड परिस्थितीतही, रायडरने कोणताही राग किंवा तक्रार न करता शांतपणे काम सुरू ठेवले. ‘कोणतीही तक्रार नाही, राग नाही… फक्त दोन अनोळखी लोक मध्यरात्री एकत्र काम करत होते, एकमेकांवर विश्वास ठेवत होते,’ असे आशाने नंतर सांगितले. १० मिनिटांच्या प्रयत्नानंतर बाईक पुन्हा चालू झाली. रायडर उठला, हात धुतले आणि हसत म्हणाला, “चला जाऊया मॅडम. तुम्हाला घरी जायचं आहे.” त्याने दिलेले वचन पाळले. रात्री १ वाजेपर्यंत आशा तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ‘सर्व पुरुष सारखे नसतात’ असे सांगत त्या रायडरचे आभार मानले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Mane (@ashamane_)

या रायडरनं फक्त सुरक्षितता दिली असं नाही, तर वेळ न दवडता मदत करून खरी माणुसकी काय असते ते दाखवून दिलं. रात्री काम करणाऱ्या सामान्य लोकांमध्येही किती संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा असू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण ठरलं. त्याच्या या प्रामाणिक वागण्यामुळे बंगळूरकरांच्या मनात त्याच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थानं त्यानं माणुसकीचं जबरदस्त उदाहरण घालून दिलं.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37

भारत-पाकिस्तान युद्ध होणार? पाकिस्तानने दिली ‘कोलकाता’ उडवण्याची धमकी; राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानचे तुकडे करू!

Tuesday, 7 April 2026, 15:33
Next Post
Maharashtra Politics: Nilesh Rane's 'sting operation'! Rane claims that 'unaccounted' Rs 25 lakh was found in the house of a BJP office bearer; What is the matter?

Maharashtra Politics: निलेश राणेंचं 'स्टिंग ऑपरेशन'! भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 'बेहिशेबी' २५ लाख सापडल्याचा राणेंचा दावा; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.