पुणे : दिल्ली उच्च न्यायालयात एका महिलेने अभिजित दिपके, सौरभ, रांका यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे.त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेल्या बनावट आणि आक्षेपार्ह छायाचित्रांमुळे या तरुणीला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेत यावर तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

न्यायालयात याचिका दाखल का झाली?

एका 25 वर्षीय महिलेने सीजेपी (CJP) या संघटनेशी जोडलेल्या चार सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सौरव दास, अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह अशी या चौघांची नावे आहेत.या चौघांनी मिळून पीडितेच्या वैयक्तिक फोटोंशी एआयच्या मदतीने छेडछाड केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या तरुणीचे अश्लील व मॉर्फ केलेले (डीपफेक) फोटो तयार केले गेले.जुलै महिन्यात दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान हे बनावट फोटो सार्वजनिकरीत्या पसरवण्यात आले.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर 24 सप्टेंबर रोजी अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी संशयितांना अटक केली नाही. तसेच, सोशल मीडियावरून हे आक्षेपार्ह फोटो हटवण्यासाठी योग्य ती पावले उचलली नाहीत, असा दावा पीडितेने केला आहे.सततच्या बदनामीमुळे आणि त्रासामुळे तरुणीने न्यायालयात याचिका दाखल करून इंटरनेटवरून हे सर्व डीपफेक फोटो तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हुबेहूब दिसणारे बनावट फोटो अथवा व्हिडिओ तयार करण्याच्या पद्धतीला ‘डीपफेक’ म्हणतात. यात मूळ चित्रांमध्ये फेरफार करून व्यक्तीची प्रतिमा मलिन केली जाते, ज्याचा वापर ब्लॅकमेलिंग आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी केला जाऊ शकतो.






