Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरला महापालिका निवडणूक लढवण्याची परवानगी; मकोका न्यायालयाचा निर्णय 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 11 December 2025, 13:17
Accused Bandu Andekar, involved in the Ayush Komkar murder case, has been granted permission to contest the municipal elections; a decision by the MCOCA court.

पुणे: आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याला पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी विशेष मकोका न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकरसह आंदेकर टोळीवरील 15 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई सुरू असून सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

 हत्यांची मालिका आणि आंदेकर टोळीवर कारवाई

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात आधीच तणावाचे वातावरण होते.  1  सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेतील डोके तालिमजवळ सहा दुचाक्यांवर आलेल्या  10-12 हल्लेखोरांनी वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार व कोयत्याने हल्ला केला. विजेचा पुरवठा खंडित करून केलेल्या या हल्ल्यात वनराजचा जागीच मृत्यू झाला. घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पुढे आली होती.

याच घटनांच्या पार्श्वभूमीवर, गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला वनराज आंदेकर याच्यावर हल्ला करणारा आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची नाना पेठेत हत्या झाली. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू असून या हत्येप्रकरणात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांच्यासह 15 जणांना अटक करण्यात आली.

आयुष कोमकर याच्या आईच्या फिर्यादीनुसार आंदेकर टोळीतील एकूण  13 जणांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांनंतर आंदेकर गटावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 निवडणूक लढण्यावर न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

बंडू आंदेकर, भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनी त्यांच्या वकिलामार्फत आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके यांनी हा अर्ज मंजूर करत,  “आरोपींना नियमानुसार निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे,” असा निर्णय दिला आहे.   वकील मिथुन चव्हाण यांनी युक्तिवादात म्हटले,  “लोकप्रतिनिधी हक्क कायद्यानुसार निवडणूक अर्ज भरण्याचा हक्क आरोपींनाही आहे,” असे सांगितले. यावर न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले की, “निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून त्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नाही.” असे न्यायालयाने म्हटले आहे.

निवडणूक लढवण्याची परवानगी मिळाल्याने, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सततच्या हत्याकांडांमुळे चर्चेत असलेल्या आंदेकर कुटुंबाची पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणात एंट्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post

Thane Kidnapping: मित्रावर विश्वास ठेवला आणि मुलांना सोडून आई बाबा फिरायला... पण पुढे जे उघडलं ते काळजाचा ठोका चुकवणारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.