Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पांढरकवडा-घाटंजी मार्गावर भीषण अपघात; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 15 April 2026, 12:41

Accident News : पांढरकवडा: पांढरकवडा-घाटंजी मार्गावर साखरा गावाजवळ 14 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात बाप आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईकिरण गुरगुल्ला (वय 32) हे आपल्या कुटुंबासह जयंतीच्या कार्यक्रमासाठी साखरा येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पत्नी आणि 6 महिन्यांच्या मुलीसह कारने आदिलाबादकडे परतत होते.

 

दरम्यान, साखरा गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी भीषण दृश्य निर्माण झाले होते. या अपघातात साईकिरण गुरगुल्ला आणि त्यांची लहान मुलगी हंसिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी अनुष्का गुरगुल्ला या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि काही समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. भरधाव वाहन चालवण्यामुळे अशा घटना वाढत असल्याने वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
Politics

Politics : 'कैसे हराया' विचारणाऱ्या सहर शेखचा गेम ओव्हर? नगरसेविका पद जाणार, एका चुकीमुळे वडिलांनाही भोगावे लागणार तुरुंगवास!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.