Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भांडगावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता; “मॅजिक बस” क्लासला जाते सांगून घराबाहेर पडली, अपहरणाचा संशय

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 May 2026, 17:18

यवत, ता. 22 : दौंड तालुक्यातील भांडगाव येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “शाळेत मॅजिक बसचा क्लास आहे,” असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या मुलीचा दिवसभर शोध घेऊनही पत्ता लागला नसल्याने कुटुंबीयांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ४३ वर्षीय वडिलांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासोबत भांडगाव येथे वास्तव्यास आहेत. टेलर काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बेपत्ता झालेली मुलही ही परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास फरीदाखातून हिने “शाळेत मॅजिक बसचा क्लास आहे,” असे सांगून घरातून बाहेर पडली.

 

मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. दुपारी चार वाजेपर्यंत कुटुंबीयांनी तिची वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता, ती शाळेतही आली नसल्याचे समोर आले.

यानंतर कुटुंबीयांनी भांडगाव परिसर, आजूबाजूचा भाग, मैत्रिणी, नातेवाईक आणि इतर ठिकाणी मुलीचा शोध घेतला. मात्र, तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बेपत्ता मुलीचे वर्णन असे : उंची सुमारे ४ फूट, रंग गोरा, काळे लांब केस, अंगात निळ्या रंगाची सलवार व निळा टॉप, पायात काळ्या रंगाच्या चप्पला, उजव्या हातात लाल-पिवळ्या रंगाचा दोरा, गळ्यात काळ्या रंगाची चैन आणि कानात पिवळ्या रंगाची रिंग. ती मराठी, हिंदी आणि भोजपुरी भाषा बोलते.

या घटनेमुळे भांडगाव परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, यवत पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भापकर करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चिनी ॲप वापरून चालवले जात होते गर्भलिंग निदानाचे रॅकेट; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 10 June 2026, 11:23

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकले! अमेरिकेने इराणच्या 20 ठिकाणांवर केला हल्ला

Wednesday, 10 June 2026, 10:42

आंबवणे येथे बेपत्ता महिलेचा नदीपात्रात मृतदेह आढळला; परिसरात शोककळा

Wednesday, 10 June 2026, 9:47

Maharashtra weather: महाराष्ट्रात मान्सूनची संमिश्र स्थिती; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबई-पुणेकरांना अद्याप प्रतीक्षा

Wednesday, 10 June 2026, 9:42

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; चहा पिण्यासाठी थांबलेल्या कारला ट्रकची जोरदार धडक, मुंबईतील तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.