Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SBI मध्ये 2,964 पदांसाठी सर्कल बेस्ड ऑफिसर भरती; 30 जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 22:58

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांमध्ये मंदी असतानाही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती जाहिरात क्रमांक CRPD/CBO/2025-26/03 अंतर्गत करण्यात आली असून, एकूण 2,964 पदे उपलब्ध आहेत. यामध्ये 2,600 नियमित आणि 364 बॅकलॉग पदांचा समावेश आहे. SBI ने अलीकडेच एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीत इंग्रजी विषय घेतला होता आणि उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना आता ईशान्य सर्कल अंतर्गत अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 जून 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा आणि त्याला कोणत्याही अनुसूचित बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी पदावर किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्याचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमातीसाठी वयोमर्यादेत 5 वर्षे, ओबीसीसाठी 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 ते 15 वर्षांची सूट लागू आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी अशा टप्प्यांचा समावेश आहे. अंतिम निवड 75 टक्के गुण ऑनलाइन परीक्षेवर आणि 25 टक्के गुण मुलाखतीवर आधारित असेल. ऑनलाइन परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा, बँकिंग ज्ञान, सामान्य जागरूकता आणि संगणक कौशल्य अशा विषयांवर एकूण 120 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील आणि यासाठी 2 तासांचा कालावधी दिला जाईल. यानंतर 30 मिनिटांची वर्णनात्मक परीक्षा होईल ज्यामध्ये पत्र लेखन आणि निबंध यांचा समावेश असेल. या परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही नकारात्मक गुण लागू होणार नाहीत.

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दोन आगाऊ वेतनवाढींसह ₹48,480 इतके मूळ वेतन मिळणार आहे. अर्ज शुल्काची बाब सांगायची झाल्यास, सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹750 इतके शुल्क निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी SBI Careers संकेतस्थळावर जाऊन CBO भरती 2025 विभागात “Apply Online” या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आवश्यक माहिती भरून फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र, शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे तसेच ओळखपत्र यांसह फॉर्म पूर्ण करून शुल्क भरायचे आहे. नंतर फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढावी.

अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एका सर्कलसाठीच अर्ज करावा आणि संबंधित सर्कलमधील स्थानिक भाषा त्याला अवगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01
Next Post

अखेर संघर्ष संपला, 'या' राशींच्या सर्व अडचणी होणार दूर; जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp