पुणे : तुम्ही बारावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, वायुसेना स्कूल येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 22 फेब्रुवारी, 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

वायुसेना स्कूल ओझर, नाशिक येथे प्राथमिक शिक्षक, नर्सरी शिक्षक प्रशिक्षित, लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आकाशवाणी फोर्स शाळा, ओझर, नाशिक येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक,नर्सरी शिक्षक प्रशिक्षित, लिपिक.
– नोकरीचे ठिकाण : ओझर, नाशिक.
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, पदवीधर, डिप्लोमा, बॅचलर ऑफ एज्युकेशन.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 10,000/- ते रु. 26,500/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आकाशवाणी फोर्स शाळा, ओझर, नाशिक.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://airforceschoolojhar.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.







