Daily Horoscope: आज 2 एप्रिल 2026, गुरुवार. आज हनुमान जयंतीचा अत्यंत शुभ योग असून ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, तर काहींसाठी सावध राहण्याचा आहे. 12 राशींचे आजचे सविस्तर भविष्य खालीलप्रमाणे आहे:

आजचे राशीभविष्य
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या टॅलेंटला वाव मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील. हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यांत मन रमेल. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
वृषभ (Taurus): नशिबाची भक्कम साथ आज तुम्हाला मिळणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी चालून येतील, त्याकडे दुर्लक्ष करू नका. मात्र, कामाच्या ओझ्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो, आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन (Gemini): आज तुम्हाला आर्थिक बाबतीत मोठे यश मिळू शकते. नवीन व्यावसायिक करारातून फायदा होईल. नोकरीत बदलाचे विचार करत असाल तर आजचा दिवस अनुकूल आहे. घरातील सदस्यांच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते, त्यामुळे धावपळ होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगा.
कर्क (Cancer): नोकरी आणि व्यवसायात स्थिती समाधानकारक राहील. महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल, पण त्यासाठी कष्टही करावे लागतील. महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींशी संवाद साधताना नम्रता ठेवा, मतभेद टाळा.
सिंह (Leo): आज आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक सुधारणा होण्यास सुरुवात होईल. मात्र, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल.
कन्या (Virgo): दिवसाची सुरुवात योग आणि ध्यानाने केल्यास मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांविषयी तुम्ही आग्रही राहाल. खर्चावर मर्यादा न राहिल्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते. सडेतोड बोलण्यामुळे इतरांच्या टीकेला पात्र ठरू शकता, त्यामुळे संयम ठेवा.
तूळ (Libra): प्रसिद्धीच्या अनेक संधी आज तुम्हाला उपलब्ध होतील. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात थोडे ताणतणाव निर्माण होऊ शकतात, पण संवादाने ते सुटतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
वृश्चिक (Scorpio): वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण होतील. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून ठेवल्यास मानसिक शांतता मिळेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
धनु (Dhanu): आजचा दिवस थोडा धावपळीचा आणि मिश्र फलदायी असेल. कामाचा वेग संथ राहू शकतो, ज्यामुळे चिडचिड होईल. मात्र, कुटुंबाचा मोठा पाठिंबा तुम्हाला आधार देईल. हनुमान चालिसाचे पठण केल्यास नकारात्मकता दूर होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मकर (Capricorn): तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च स्तरावर असेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा पदोन्नतीची बातमी मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागतील. मात्र, कामाच्या ताणामुळे कुटुंबातील सदस्यांना वेळ देणे कठीण जाईल, ज्यामुळे थोडी नाराजी असू शकते.
कुंभ (Aquarius): आज नवीन लोकांशी संपर्क येईल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. तरीही, आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकं वर काढू शकतात, त्यामुळे वेळेवर आहार आणि विश्रांती घ्या.
मीन (Pisces): आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. भागीदारीच्या व्यवसायात यश मिळेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. ग्रहांच्या स्थितीमुळे मन थोडे विचलित होऊ शकते. आध्यात्मिक कार्यांत वेळ घालवल्यास मन शांत राहील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
(Disclaimer): वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. ही केवळ सामान्य माहिती असून कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्यावा.







