Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर दुर्मीळ गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचे मूळ कारण समोर; एनआयव्हीचा अहवाल काय सांगतो? वाचा सविस्तर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 January 2025, 14:00

पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने चिंतेचे वातावरण आहे. अशातच हा आजार कशामुळे होतो? याबद्दल माहिती समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झाले आहे. दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरतात. पुण्यातील रुग्णांना बाधा यामुळेच झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे काही रुग्णांचे शौच व रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संस्थेने या रुग्णांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला पाठविला आहे. त्यात काही रुग्णांना कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हीची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाबही आहेत.

जीवाणू अथवा विषाणू संसर्ग झाल्यानंतरही रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना १ ते ३ आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो. हा चेतासंस्थेशी निगडित विकार असून त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो.

कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग कशामुळे होतो?

कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. दरवर्षी जगभरात १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. त्यात ५ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक दिसून येते. या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण २ ते ५ दिवसांत बरा होतो. मात्र, काही रुग्णांमध्ये नंतर गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा होते.

नोरोव्हायरसचा संसर्ग कशामुळे होतो?

जीबीएस रुग्णांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. दरवर्षी जगभरात ६८ कोटींहून अधिक जणांना याचा संसर्ग होतो आणि त्यामुळे वर्षाला सुमारे २ लाख जणांचा मृत्यू होतो. हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला तरी तो हवेतूनही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. बाधित रुग्णाने उलटी केल्यास त्यातून हा विषाणू हवेत पसरून इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण १ ते ३ दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो.

पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या ६७ वर

गुलियन बॅरी सिंड्रोमचा धोका पुण्यात वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात ५९ रुग्णांमध्ये आणखी ७ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या आता ६७ वर गेली आहे. यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून जि बी एस रुग्‍णांची संख्‍या गुरुवारपर्यंत ६७ वर पोचली आहे. यामध्‍ये पुणे ग्रामीणमध्‍ये सर्वाधिक ३९, शहरात १३ पिंपरी चिंचवडमध्‍ये १२ तर ३ रुग्‍ण इतर जिल्ह्यांतील आहेत. जवळपास ८० टक्‍के रुग्‍ण हे खासगी रुग्‍णालयांत तर उरलेले २० टक्‍केच रुग्‍ण हे ससून या वैद्यकीय शिक्षण विभागाच्‍या सरकारी रुग्‍णालयात उपचार घेत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची मदत प्रक्रिया होणार पेपरलेस; स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp