Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Timepass-3: पुन्हा एकदा होणार फुल्ल ‘टाइमपास’ या दिवशी रिलीज होतोय ‘टाइमपास’ -3..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 14:08

मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘टाईमपास’च्या सीरिजमधील या तिसऱ्या भागात अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,’ असं कॅप्शन देत हृताने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाच्या टीझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाबद्दलची हीच उत्सुकता आणि उत्कंठा आता ट्रेलरमधून अधिकच वाढणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर एका शानदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, निर्मात्या मेघना जाधव यांसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचं आहे.

दरम्यान, चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून त्यांच्यासोबतीने प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. ‘टाइमपास ३’ चा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून येत्या २९ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post

आता संसदेत पॅम्प्लेट्स आणि फलकांवरही बंदी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.