पुणे: यशराज (Mardaani 3) फिल्म्सच्या गाजलेल्या मर्दानी या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून १२ जानेवारी रोजी त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या कणखर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
सध्या इंटरनेटवर या ट्रेलरची प्रचंड चर्चा आहे, पण यावेळी राणीसोबतच चित्रपटातील महिला खलनायिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सिनेमात खलनायिका एका मानवी तस्करी करणाऱ्या टोळीच्या आणि बेगर माफियांची प्रमुख म्हणून दिसत आहेत. ट्रेलरमध्ये त्यांचा अभिनय अतिशय भीतीदायक वाटतो.
या भागात शिवानी रॉयचा सामना अम्मा नावाच्या एका अतिशय निर्दयी महिलेशी होणार आहे. ही क्रूर भूमिका कोणत्या अभिनेत्रीने केली आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
चित्रपटात अम्माची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव मल्लिका प्रसाद असे आहे. मल्लिका प्रसाद या मूळच्या बंगळुरूच्या असून त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि लंडनच्या गोल्डस्मिथ कॉलेजमधून अभिनयाचे उच्च शिक्षण घेतले आहे.
आता मल्लिका प्रसाद यांनी साकारलेली ही नवी भूमिका या मालिकेतील सर्वात भयंकर व्हिलन ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राणी मुखर्जीचे दमदार संवाद आणि मल्लिका प्रसाद यांचा करडा अंदाज यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता वाढली आहे.







