Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मला डीजे व्हायचं आहे, असे अक्षरशः परीक्षेच्या पेपरात लिहून तो झाला यशस्वी डीजे ; डीजेत करियर करताना होणाऱ्या तरुणाच्या धडपडीची कहाणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 23 November 2022, 14:57

पुणे – पूर्वी फक्त उच्चशिक्षित, पाश्चिमात्य संस्कृती जोपासणारे, अमराठी तरुण – तरुणींचा भरणा असलेल्या प्रतिष्ठित, वैभवसंपन्न कुटुंबातील नागरिकच डीजे या व्यवसायात आपले पाय रोवून संपूर्ण अत्याधुनिक संगीत क्षेत्रातील मार्केट आपल्या ताब्यात ठेवत असे, परंतु हर्षवर्धन साळवे या तरुणाने ही जुनी संकल्पनाच उलथून टाकत या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे, तर अनेक नवीन तरुणांना देखील तो या आधुनिक संगीताच्या क्षेत्रात काम करताना संधी देऊन त्यांना आपल्या पुणे डीजे असोसिएशन संस्थेच्या माध्यमातून संरक्षणही देत आहे .

सध्या डीजे (डिस्क जॉकी) चा जमाना आहे. पूर्वीच्या, लग्न, मिरवणुका, आनंदोत्सवात वापरण्यात येणाऱ्या, ढोलीबाजा, नगारा, ढोलपथक, बेंजो पार्टी, आदी वादनाची जागा आता जिथे तिथे साऊंड सिस्टीमने घेतली आहे, आणि हा साऊंड वाजवणार वादक म्हणजे डी जे  होय.

डीजे व्यवसायिक करियर म्हणून स्वीकारणे येथून १५ वर्षापूर्वी केवळ काही उच्च वर्गातील पाश्चिमात्य संस्कृतीची जोपासना करणाऱ्या तरुण तरुणींचा  हक्काचा व्यवसाय होता.

 

आज पुण्यातील नाना पेठ येथे राहणाऱ्या हर्षवर्धन साळवे उर्फ डीजे हर्ष याने गेल्या पाचच वर्षात ध्येयवेडा होत अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपने काम करत एक वेगळं नावलौकिक कमावले आहे.

सध्या तो पुण्यातील डी जे असोसिएशन चा संस्थापक अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या काम करताना पुण्यातील अनेक लहान मोठ्या डीजेवर इव्हेंट मालक, साऊंड मालक, पार्टी ऑर्गनायझर, क्लब मालक यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढून त्यांना सन्मान आणि न्याय देण्याचा महत्त्वपूर्ण काम करीत आहे.

हर्षची डीजे बनण्याची रोमांचक कहाणी –
पुण्यातील नाना पेठ येथे हर्ष आपल्या आई वडील आणि दोन मोठे भाऊ यांच्यासोबत राहतो. लहानपणापासून हर्ष अभ्यासात अतिशय हुशार होता परंतु, संगीताची त्याला खूप आवड होती. त्यासाठी त्याने तबला वादनाच्या तीन परीक्षाही दिल्ली घराण्यातून यशस्वीरीत्या पास केल्या होत्या.

त्यामुळे तो तबला उत्तम वाजवतो. नववीत तो वडिलांना म्हणाला बाबा मला संगीतातल्या अत्याधुनिक डी जे क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यावेळी वडील म्हणाले दहावी चांगल्या गुणांनी पास कर मी तुला डी जे क्लास लावतो, हर्ष दहावीला तब्बल ८३% गुण घेऊन यशस्वी झाला होता.

अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, सरळ मार्गी असलेल्या हर्षवर्धन यांच्या वडिलांनी मुलाने या संगीत क्षेत्राचा नाद करून आयुष्य उध्वस्त करू नये म्हणून त्याला टिळक रोड येथील अशोक महाविद्यालयात सायन्स विभागात प्रवेश मिळवून दिला. हर्षचे तेथे मनच रमत नव्हते, सतत डीजे बनायचं ध्यास त्याचे पाठलाग करीत होता.

११वी ची अंतिम परीक्षा जवळ आली असता त्याच्या मित्राने हर्षला सांगितले भाऊ एकच मार्ग आहे तुला जे बनायचे आहे ते पेपर मध्ये लिही डीजेच्या स्वप्नाने वेड्या झालेल्या हर्षने प्रत्येक पेपर मध्ये i want to be dj, i am not interested in study असे लिहलेले होते. वर्गशिक्षकांनी हर्षचे पेपर मुख्याध्यापकांना दाखवले असता मुख्याध्यापकही आश्चर्यचकित होऊन हर्षचे पेपर नोटीस बोर्ड वर लावले आणि हर्षला आणि त्याच्या वडिलांना लगेचच बोलून घ्या असे म्हणाले.

मुख्याध्यापक समोर येताच वडिलाची पेपर पाहून बोलतीच बंद झाली, वडील हर्षकडे अतिशय रागाने बघू लागले मात्र मुख्याध्यापक समोर आसल्याने काहीच करता येईना हर्षने मला डीजे होऊन काय करायच आहे याचा आपल्या वहीत लिहिले. भविष्यातील मार्गच मुख्यध्यापकाकडे मांडून ठेवला असता मुख्यद्यपकाही चक्रावून गेले.

अतिशय लहान वयात मुलाला बेल्जियमला टूमारो लांड हा प्रत्येक डीजेच्या आयुष्यातील सर्वोच्च इव्हेंट प्ले करायचा आहे असे हर्षने सांगितले असता शेवट मुख्याध्यापकच म्हणाले बाळ मी तुझा डीजे क्लास लावतो मी तुझी २५००० फी भरतो, पण तू शिक तू हुशार आहेस मी १२ वीला प्रवेश देतो असे सांगितले, त्यावेळी हर्ष शिकण्यासाठी तयार झाला.

घरी जात असता मग वडिलांनीच लाजत लाजत मी स्वतः  डीजेच्या क्लासचे पैसे भरतो असे सांगितले आणि मग पुण्यातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध आर्टिस्ट असलेल्या सन्नी पूर्व कडे हर्षने क्लास लावला आणि तेथूनच त्याची डीजेच्या करियरची सुरुवात झाली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

महाराष्ट्र केसरी पुणे शहर संघाची निवड चाचणी शनिवारपासून ; स्व. दामोदर टकले यांच्या स्मरणात स्पर्धेचे आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.