मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करणारा रणवीर सिंहचा स्पाय-थ्रिलर ‘धुरंधर 2’ आता डिजिटल पडद्यावर धडकण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटगृहात 1660 कोटींहून अधिक गल्ला जमवल्यानंतर, हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींचा टप्पा पार केला, तर अवघ्या काही दिवसांत 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना वेड लावले. रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट ठरला आहे.

‘धुरंधर’चा पहिला भाग नेटफ्लिक्सवर सुपरहिट ठरला होता, पण दुसऱ्या भागासाठी दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे डिजिटल हक्क Jio Hotstar ला विकले आहेत. याचाच अर्थ, हा हाय-व्होल्टेज ॲक्शन ड्रामा पाहण्यासाठी चाहत्यांना जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.
आयपीएल 2026 च्या (IPL) धामधुमीमुळे मेकर्सनी ओटीटी रिलीज थोडा लांबणीवर टाकला आहे. क्रिकेटचा फिव्हर कमी झाल्यानंतर, म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट स्ट्रीम होण्याची दाट शक्यता आहे.







