मुंबई: प्रायव्हेट डिटेक्टिव्हने बॉलिवूडमधील (Bollywood News) एक धक्कादायक सत्य उघडकीस आणले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री जगासमोर दाखवण्यासाठी रिलेशनशिपमध्ये असतात, परंतु त्या ‘वन नाईट स्टँड’ मधून लाखो रुपये कमावतात. चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री केवळ ‘वन नाईट स्टँड’ मधून पैसे कमावते. असा दावा प्रायव्हेट डिटेक्टिव्हने केल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. एका मुलाखतीत प्रायव्हेट डिटेक्टिव्हने बॉलिवूडमधील हे ‘काळ सत्य’ चाहत्यांसमोर आणले. ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये जास्त सक्रीय नाही पण तिची प्रतिमा तिच्या चाहत्यांसमोर खूप चांगली असल्याचे डिटेक्टिव्हने मुलाखतीत सांगितले आहे.

डिटेक्टिव्हने दिलेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री अनेक देशांमध्ये विविध कार्यक्रमांचे उद्घाटन आणि विशेष उपस्थिती (Appearance) लावण्यासाठी अनेक ठिकाणी जाते. पण, हॉटेलमध्ये ती अनेक व्यक्तींना भेटते आणि तिच्या भेटीचा उद्देश ‘एस्कॉर्ट’ म्हणून काम करणे हा असतो. सार्वजनिक जीवनात रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगते पण हे नातं केवळ नावापुरते आहे. हॉटेल्समध्ये ती ग्राहकांना भेटते आणि त्यांच्याकडून वन नाईट स्टँडचा 20 लाख रुपयांपर्यंत चांगला पैसा उकळते. अभिनेत्रीचे केवळ एका नव्हे, तर अनेकांशी संबंध आहेत.
तपासादरम्यान, या अभिनेत्रीच्या पार्टनरने डिटेक्टिव्हशी संपर्क साधला होता. तेव्हा ही बाब समोर आली आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, अभिनेत्रीचे हे सत्य समोर आल्यानंतरही तिचा पार्टनर तिच्यासोबत राहिला. कारण अनेक प्रकरणांमध्ये अभिनेत्रीने कमावलेले पैसे पार्टनरसाठी उपयुक्त ठरतात, ज्यामुळे ते नाते तोडत नाही.
डिटेक्टिव्हच्या या सनसनाटी खुलाशामुळे बॉलिवूडचे हे काळं सत्य (Black Truth) आता चव्हाट्यावर आले आहे. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरच्या मागे चालणाऱ्या या धक्कादायक प्रकाराने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.







