Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देऊळ बंद 2 च्या यशानंतर अतुल कुडले यांचा खास सन्मान; प्रवीण तरडे यांच्या हस्ते मिळाला ‘बेस्ट आर्टिस्ट’ पुरस्कार

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 1 August 2026, 8:15

पुणे: ‘देऊळ बंद 2’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करत मोठे यश मिळवले. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी यांनी संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक टीमसाठी विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन केले. या कार्यक्रमात अनेक कलाकार आणि सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात अभिनेता तसेच चित्रपटाचे कार्यकारी निर्माते रमेश परदेशी (पिट्या भाई), अतुल कुडले आणि विनोद वनवे यांना विशेष पुरस्कार देण्यात आले. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते प्रत्येकाला ₹1 लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पुरस्कार जाहीर करताना प्रवीण तरडे यांनी अतुल कुडले यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत अतुलने शिस्त, मेहनत आणि समर्पण कायम ठेवले. संपूर्ण शूटिंगदरम्यान त्यांनी एकदाही संवादात चूक केली नाही. रोज सेटवर वेळेवर येत होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सलग 50 दिवस महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहांमध्ये जाऊन त्यांनी चित्रपटाच्या प्रचारासाठी मेहनत घेतली. “कलाकार कसा असावा, तर अतुल कुडलेसारखा,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

रमेश परदेशी यांच्याबद्दल बोलताना प्रवीण तरडे यांनी चित्रपट निर्मितीदरम्यान आलेल्या अनेक अडचणी त्यांनी शांतपणे सोडवल्याचे सांगितले. “अनेक कठीण प्रसंगात मी फक्त पिट्या भाईंचेच ऐकत होतो,” असेही त्यांनी नमूद केले.

 

‘देऊळ बंद 2’मध्ये अतुल कुडले यांनी ‘दत्ता पायगुडे’ या शेतकरी तरुणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्या भूमिकेचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये ही भूमिका लोकप्रिय ठरत आहे.

सन्मान स्वीकारल्यानंतर अतुल कुडले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास आज या टप्प्यावर पोहोचला, ही मोठी आनंदाची बाब आहे. झी मराठीवरील मालिकांमधून ओळख मिळाल्यानंतर प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि आता अशा मोठ्या चित्रपटाचा भाग बनल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असतानाच अभिनयाची आवड जपत अतुल कुडले यांनी रंगभूमीवरून प्रवास सुरू केला. त्यानंतर झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील शत्रुघ्न निंबाळकर ही भूमिका लोकप्रिय ठरली. आता ‘देऊळ बंद 2’मधील दमदार अभिनयामुळे ते मराठी चित्रपटसृष्टीतील आश्वासक नवोदित कलाकार म्हणून चर्चेत आले आहेत.

प्रवीण तरडे यांच्या हस्ते मिळालेला ‘बेस्ट आर्टिस्ट’ पुरस्कार आणि सार्वजनिक कौतुक हा अतुल कुडले यांच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दोन दिवस, सलग बैठका अन् मोठी रणनीती! ‘कॉकरोच’ टीम संभाजीनगरमध्ये दाखल; बैठकीकडे राज्याचं लक्ष

Tuesday, 4 August 2026, 23:08

‘गुंगी गुडिया’ शब्दावरून राजकारण तापले; काँग्रेसने तात्काळ माफी मागावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एल्गार

Tuesday, 4 August 2026, 22:55

मद्यप्रेमींना मोठा धक्का! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर सरकारची बंदी; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Tuesday, 4 August 2026, 22:43

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 22:13

पिंपरी-चिंचवडच्या नामांकित हॉटेलचा भांडाफोड! पावभाजीत अळी; FDAची तातडीची कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:58

देशभरात तब्बल १५० कोटींचा महा-घोटाळा! सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आणत आळंदी पोलिसांची धडक कारवाई

Tuesday, 4 August 2026, 21:31
Next Post

1 ऑगस्टपासून बदलणार हे 9 मोठे नियम; LPG, रेल्वे, ITRपासून बँकिंगपर्यंत सर्वांवर होणार परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.