Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बार्टीच्या धर्तीवर सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 September 2024, 19:30

-संतोष पवार

पळसदेव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला (BARTI) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची 100 टक्के रक्कम संशोधक विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. मात्र, या निर्णयामुळे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARTHI) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (MAHAJYOTI) संस्थांतील संशोधक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सारथी’संस्थेच्या 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि ‘महाज्योती’च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नियोजन विभागाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तिन्ही संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांकडे शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना सरसकट 50 टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बार्टीच्या संशोधक उमेदवारांनी हा निर्णय झुगारून त्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बार्टीच्या 763 उमेदवारांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे आता सारथी, महाज्योती या संस्थेतील संशोधक उमेदवार संतप्त झाले होते. त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यापुर्वीच राज्य सरकारकडून सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47
Next Post
illegal construction in pune APMC

सभापती दिलीप काळभोर यांच्याकडे पुन्हा सह्यांचे अधिकार; पुणे बाजार समितीत मोठी घडामोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp