Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mit News : खेळ पराभव पचविण्यास शिकवतो ; कमांडंट देवराज गिल यांचे मत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 October 2023, 19:27

पुणे : खेळ हा प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी गोष्ट असून, त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. याशिवाय खेळ हा प्रत्येकाला आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट शिकवतो ती म्हणजे पराभव पचविणे. त्यामुळेच एका चांगल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती ही सामाजिक जीवनात मैदानाबाहेरही उठून दिसते, असे पुणे आर्मी क्रीडा अकादमीचे कमांडंट देवराज गिल यांनी सांगितले.

एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वराजबाग येथे प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा) द्वारे आयोजित ‘पेरा’ प्रीमिअर चॅम्पियनशिपच्या उद्‌घाटन समारंभावेळी ते बोलत होते. ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष व ‘पेरा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, ऑलिंम्पियन बॉक्‍सर मनोज पिंगळे, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे डॉ. गुलजार शेख, एमआयटी डब्लूपीयूचे पोपट धानवे, डॉ.अतुल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रा. डॉ. कराड म्हणाले की, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वच आघाड्यांवर पुढे जात आहे. खेलो भारत, टार्गेट ऑलिम्पिक पोडियमसारख्या योजनांमुळेच भारताने हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पदकांचे शतक पूर्ण केले. त्यातूनच प्रेरणा घेत ‘पेरा’ चॅम्पियनशिपच्या माध्यमातून राज्यातील नामांकित खासगी विद्यापीठांनी एकत्रित येत या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले. ज्याला तब्बल ३५ विद्यापीठांनी उत्तम प्रतिसाद दिला, ज्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली आहे.

एमआयटी शिक्षण समूहाने कायमच ‘विश्‍वनाथ स्पोर्टस मिट’सारख्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याचे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे “पेरा’च्या माध्यमातून सहभागी खेळाडूंनी पुढे जाऊन आपल्या देशाचे नाव मोठे करावे यासाठी माझ्या मनस्वी शुभेच्छा.

 

विश्‍वशांती प्रार्थना व दीपप्रज्वलनानंतर ‘मॅनेट’ बॅंडच्या आकर्षक सलामीद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व सहभागी विद्यापीठांच्या ध्वजवाहक यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंचे संचलन मैदानावर घेण्यात आले. त्यामध्ये ३५ हून अधिक विद्यापीठांतील तीन हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. हे सर्व खेळाडू पुढील तीन दिवस १५ हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचे कौशल्य पणाला लावणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुराज भोयार यांनी केले तर आभार ‘पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार यांनी मानले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची अखेर उचलबांगडी! तडकाफडकी बदलीचा GR; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

Friday, 2 October 2026, 16:41

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42
Next Post
Rajasthan Election 2023 congress president Mallikarjun Kharge Reaction On Ed Action Ashok Gehlot Son Vaibhav Gehlot

Rajasthan Election 2023: काँग्रेस घाबरणार नाही, एक दिवस भाजपलाही भोगावे लागेल', ईडीच्या छाप्यांवरून मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp