Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठातर्फे येत्या शनिवारपासून पाचवे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट स्पर्धेचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 24 January 2023, 16:30

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर (ता. हवेली) यांच्यातर्फे शनिवार, दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पाचव्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ”विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट- २०२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठातील मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन २८ जानेवारीला प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार विजेती आणि ऑलंम्पिक कांस्य पदक विजेती (बॉक्सिंग) लवलीन बोरगोहेन, भारतीय महिला मुष्टियुद्ध संघाचे मुख्य प्रशिक्षक भास्करचंद्र भट, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ १ फेब्रुवारीला प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि अर्जून पुरस्कार प्राप्त, (रोईंग) ऑलंम्पियन दत्तु भोकनाळ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव आणि विश्वनाथ स्पोर्ट समीट 2023 च्या नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा संचालक आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड उपस्थित होते.

डॉ. अनंत चक्रदेव म्हणाले की, विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट या स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. कोविड-१९ मुळे गेली दोन वर्ष या स्पर्धा झाल्या नव्हत्या. यंदाच्या स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील चार हजाराहून अधिक स्पर्धांकांनी यात सहभाग घेतला आहे. यंदा १४ विविध खेळ प्रकारात या स्पर्धा खेळवल्या जातील.

पाच दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेट (पुरुष), कबड्डी (पुरुष व महिला), फुटबॉल (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष व महिला), बास्केट बॉल (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बॅडमिंटन (पुरुष व महिला), टेनिस (पुरुष व महिला), वॉटर पोलो (पुरुष), जलतरण (पुरुष व महिला), रोईंग (पुरुष व महिला), मुष्टीयुद्ध (पुरुष व महिला), धनुर्विधा (पुरुष व महिला) आणि बुद्धीबळ (पुरुष व महिला) या स्पर्धा रंगणार आहेत.

या स्पर्धांमध्ये राज्यभरातून दोनशेहून अधिक शिक्षण संस्थांमधील चार हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. विजेत्या स्पर्धांकांसाठी यंदा १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

यात ७ लाख ५० हजाराचे रोख पारितोषिक आणि २.५ लाखाचे मेडल, ट्रॉफी आणि इतर पारितोषिक असणार आहेत. आता पर्यंत या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ११० संघ आणि ३६०० खेळाडूंनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आणि संघांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ww.mituniversity.edu.in/vsm या संकेतस्थळावर स्पर्धेसाठीची नोंदणी आणि नोंदणी शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर, पुणे- 412201 या पत्यावर प्रवेश अर्ज पाठवावे, असे आवाहन ही डॉ. अनंत चक्रदेव यांनी यावेळी केले.

दरम्यान, क्रिकेट व्यतिरिक्त इतर स्पर्धांसाठी 26 जानेवारी 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- सिद्धार्थ गर्ग 8421901110, सुनील मोरे 9763398136. यांना करावा.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालावर डल्ला ; चार जणांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या , खोडद येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.