Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकदिनी शिक्षकांना धक्का ; पुणे विभागातील ‘या’ शिक्षकांना करावे लागणार विनावेतन काम!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 September 2023, 13:24

पुणे : शिक्षक दिन म्हणून देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशीच शिक्षकांच्या वेतनासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे विभागातील संस्थांचालकांच्या चुकांमुळे पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शिक्षकांचा पगार रखडणार आहे. शालार्थ आयडीच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा फटका या शिक्षकांना बसणार आहे. शालार्थ आयडी निघाल्याशिवाय शिक्षकांचे पगार होत नाहीत. यामुळे या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठी एक शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात १६७ शिक्षकांचे प्रस्ताव आले. त्यापैकी १६१ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याने, हे प्रस्ताव फेटाळण्यात आले. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत असणारी ही प्रकरणे आहेत.

राज्यात २०१२ नंतर शिक्षक भरतीला बंदी होती. त्या काळात भरती झाली आहे. कर्मचाऱ्यांची भरती करताना संस्थांचालकांनी रितसर परवानगी घेतली नाही. काही शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव अर्धवटच सादर केले गेले. यामुळे हे प्रस्ताव फेटाळण्यात आले. पुणे येथील अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांची पुणे बोर्डात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर १६१ प्रस्ताव फेटाळले. याचा फटका शिक्षकांच्या वेतनाला बसणार आहे.

 

शालार्थ आयडी क्रमांक म्हणजे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता आहे, असे मानले जाते. हा क्रमांक मिळाल्यानंतरच वेतन सुरू होते. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यासंदर्भातील प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारींकडे पाठवतात. प्रस्ताव पुढे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे जातो. त्यांच्याकडून शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यानंतर शिक्षण उपसंचालक आणि शेवटी शिक्षण संचालकांकडून मान्यता दिली जाते. परंतु त्रुटी असल्यास हे प्रस्ताव फेटाळण्यात येतात. पुणे विभागास राज्यातील इतर विभागांमध्ये अशी प्रकरणे घडली आहेत. यामुळे त्या शिक्षकांसमोर वेतनचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Shirur News : घोड नदीवरील अण्णापूर-म्हसे पूल ठरणार पुणे-नगर जिल्ह्यांना जोडणारा दुवा ; विद्यार्थी, शेतकरी, प्रवाशांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.