नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात टॅब्लेटचा वापर स्मार्टफोनसारखाच वाढताना दिसत आहे. हा टॅब्लेट लॅपटॉपच्या तुलनेत वापरणे खूप सोपे आहे. हा टॅब्लेट एका लहान बुकसारखाच दिसत आहे. त्यामुळे तुम्ही तो सहजपणे कुठेही नेऊ शकता. आजकाल टॅब्लेट खूप लोकप्रिय होत आहेत.

‘इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन’च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या टॅब्लेट मार्केटमध्ये 2024 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 42.8% वाढ झाली आहे. यावर्षी एकूण 57.3 लाख टॅब्लेटची विक्री झाली आहे, ज्यामध्ये डिटेचेबल आणि स्लेट टॅब्लेटचा समावेश आहे. डिटेचेबल टॅब्लेटच्या विक्रीत 30% आणि स्लेट टॅब्लेटच्या विक्रीत 47.2% वाढ झाली आहे. काही योजनांमध्ये विलंब झाल्यामुळे 2024 च्या Q4 मध्ये 17% घसरण झाली असली तरी, संपूर्ण वर्षाची कामगिरी अजूनही चांगली होती.
सॅमसंगने 42.6% शेअरसह बाजारात आघाडी दिसून आली. तसेच Acer ग्रुप व्यावसायिक विभागात चांगली कामगिरी करत आहे आणि 18.7% शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. Apple 11% शेअरसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने व्यावसायिक आणि ग्राहक दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. Xiaomi आणि Lenovo दोघेही 9% मार्केट शेअरसह चौथ्या स्थानावर आहेत. अशाप्रकारे टॅब्लेटमध्ये खरेदी-विक्री दिसून आली.







