नवी दिल्ली : सध्या UPI द्वारे पेमेंट करण्याला प्राधान्य दिलं जातं. UPI चा वापर ई-रिक्षापासून ते मेट्रो ट्रेन आणि भाजीच्या दुकानांपर्यंतच्या पेमेंटसाठी केला जात आहे. UPI पेमेंट संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुम्ही देखील UPI द्वारे पेमेंट करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की NPCI 1 फेब्रुवारीपासून काही व्यवहार ब्लॉक करणार आहेत.

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने एक परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारीपासून, स्पेशल कॅरेक्टर असलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरून तयार केलेल्या आयडीद्वारेच व्यवहार युजर्ससाठी स्वीकारले जातील. मात्र, जे हे फॉलो करणार नाहीत, अशा लोकांचे आयडी ब्लॉक केले जातील. NPCI ची ही सूचना 1 फेब्रुवारी 2025 पासून बदलणार आहे.
NPCI ने UPI ऑपरेटर्सना स्पष्ट केले आहे की, त्यांनी UPI ट्रान्झॅक्शन आयडीसाठी अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स वापरणे सुरु करावे, अन्यथा केंद्रीय सिस्टीम त्या ॲपवरून कोणत्याही UPI व्यवहारास परवानगी देणार नाही. या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी पेमेंट ॲपवर असणार आहे.








