तुषार ओहोळ
बारामती : पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे (ता.२६ में )रोजी घडली आहे.या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात आरोपी लहू रामा वायकर (वय ४८ वर्ष,रा.बांदलवाडी, ता.बारामती, जि.पुणे) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला असून, याबाबतची फिर्याद भगवान हनुमंत बिस्दवडे ( वय ४२ वर्ष,रा.बांदलवाडी,ता.बारामती,जि.पुणे) यांनी दिली आहे.

बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२५ में रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बांदलवाडी येथे फिर्यादीचे दाजी लहू रामा वायकर (वय ४८ वर्षे.बांदलवाडी ता. बारामती जि पुणे )याने फिर्यादीची बहीण सौ. संजना लहु वायकर (वय ४० वर्षे,( रा. बांदलवाडी ता बारामती जि. पुणे )हिच्यावर चारित्र्याचा संशय घेवुन धारधार शस्त्राने तिच्या डोक्यात, कपाळावर, तसेच तिच्या चेहऱ्यावर मारून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. दरम्यान जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यु झाला.
या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आरोपी लहू रामा वायकर याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत करत आहेत.







