Vikas lawande News पिंपरी-चिंचवड, ता. ९ : हिंदू धर्माच्या प्रचार, प्रसारासाठी काम करणाऱ्या प्रबोधरकार, कीर्तनकार आणि संतांचा आदर ठेवलाच पाहिजे. विकास लवांडे यांच्याबाबत ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांनी केलेल्या शाईफेकीचे आम्ही जाहीर समर्थन करतो, असे भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. Vikas lawande News
‘‘वारकरी सांप्रदायातील २० घुसखोर’’ अशी टीका करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीरपणे केली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटनांमधून निषेध व्यक्त होत होता. दरम्यान, ह.भ.प. संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आळंदी येथे लवांडे यांच्यावर शाईफेक केली. Vikas lawande News

आमदार लांडगे म्हणाले की, ह.भ.प. संग्रामबापू हे सुरुवातीपासूनच धर्मनिष्ठ असून हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. “वारकरी संप्रदायातील आदरणीय महाराज मंडळींबद्दल लवांडे यांनी वापरलेले शब्द अत्यंत चुकीचे होते. समाजातील अशा प्रवृत्तींविरुद्ध लोकांमध्ये संताप असणे स्वाभाविक आहे. ज्या २० व्यक्तींच्या संदर्भात लवांडे यांनी वक्तव्य केले आहे, त्यांचे सामाजिक कार्य त्यांनी आधी पाहावे. हे महाराज समाजातील वंचित घटकांसाठी अविरत काम करत आहेत. वैचारिक मतभेद की पातळी? हा राजकीय वाद नसून वैचारिक मतभेदाचा विषय आहे.
दरम्यान, लवांडे यांच्यासारखी मंडळी स्वतःला विद्वान समजून समाजात विष कालवण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. वारकरी संप्रदाय आणि धार्मिक परंपरांवरील टीका समाज सहन करणार नाही, इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे. Vikas lawande News
“आपण प्रवक्ते म्हणून हुशार असाल, पण वारकरी संप्रदायातील दिग्गजांवर बोलण्याइतकी कोणाचीच उंची नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी’’ अशी शिकवण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी दिली आहे. समाजाला दिशा देण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलणे गैर नाही. त्यामुळे ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांचे जाहीर समर्थक करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.






