
मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीव तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे जो थायलंडहून मुंबईत दुर्मिळ आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी करत होता. ही तस्करी बँकॉकहून मुंबईला आलेल्या विमानातून होत होती, पण सीमाशुल्क विभागाने ती हाणून पाडली.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2025 रोजी मुंबई विमानतळावर एक महत्त्वपूर्ण कारवाई केली. तपासादरम्यान, एका प्रवाशाच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली आणि त्याच्या बॅगेत विविध वन्यजीव प्रजातींचे जिवंत आणि मृत प्राणी सापडले. त्यात 52 वेगवेगळी प्रजातींचे प्राणी समाविष्ट होते. तपासणी दरम्यान, प्रवाशाच्या वर्तनावरून त्याला गुप्त माहितीच्या आधारावर संशय आला होता. तपासणी करताच, त्याच्या बॅगेत जिवंत स्पायडर टेल्ड हॉर्नड वाइपर, एशियन लीफ टर्टल आणि इंडोनेशियन पिट व्हायपर सापडले. यावर, प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्राण्यांची तस्करी कुठे केली जाणार होती याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

तपासणीत जप्त करण्यात आलेले प्राणी
स्पायडर टेल्ड हॉर्नड वाइपर : 03 जिवंत साप, जे CITES च्या परिशिष्ट-II आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
एशियन लिफ टर्टल: 05 जिवंत कासवे, जे CITES च्या परिशिष्ट-II आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
इंडोनेशियन पिट व्हायपर : 44 साप (43 जिवंत आणि 1 मृत), जे CITES च्या परिशिष्टांत समाविष्ट नाहीत.
या प्रकरणात पुढील तपास सुरू असून तस्करीचे नेटवर्क आणि त्या संदर्भातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.







