Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! पुण्यात दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या लेकीवर होणाऱ्या नवऱ्याकडून अत्याचार, त्यानंतर तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 27 May 2025, 15:15

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच आता पुण्यातील दिवंगत पोलीस अधिकाऱ्यांच्या लेकीवर होणाऱ्या नवऱ्याकडूनच अत्याचार करत 16 लाख रुपयाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसात सेवा करूनही मुलीची तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल 21 दिवस वाट पहावी लागल्याची तक्रार पिडीतेच्या आईने केली आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता पुण्यातील मांजरीची रहिवासी असून ती ब्युटी पार्लर चालवते. तिने तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2020 मध्ये ती लोणी काळभोर येथील एका जिममध्ये काम करत होती. आरोपी श्यामनाथ गंभीरे (वय 25) हा त्या जिममध्ये ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट होता. पीडिता तिथे एक महिना काम करून सोडून गेली.जून 2021 मध्ये पीडितेच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला. म्हणून, पीडिता आरोपी गंभीरेकडे गेली आणि तिच्या आईसाठी डाएट प्लॅन देण्याची विनंती केली. यानंतर गंभीरे पीडितेच्या घरी येऊ लागला. तो तिच्या वडिलांसोबत बसून गप्पा मारत असे. या दरम्यान, गंभीरे आणि पीडिता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने तिच्यावर अत्याचार करत तिची तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक केली.

आरोपीने तिच्या कुटुंबाची फसवणूक कशी केली याबद्दल माहिती देताना महिलेने सांगितले की, पीडितेच्या वडिलांचे मांजरीमध्ये एक घर होते. त्यांना नवीन घर घेण्यासाठी जुने विकायचे होते. आरोपीने कुटुंबाला ते घर विकण्यास मदत केली. त्याने त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.पीडितेने आरोप केला की, आरोपीने तिच्या कुटुंबाकडून 16 लाख 42 हजार 271 रुपये घेतले. त्याने पीडितेच्या नावावर कर्ज घेऊन एक बाईकही खरेदी केली. दरम्यान दोघांचा साखरपुडा झाला त्यानंतर लग्न होणार होते. मात्र गंभीरे तिला शॉपिंगच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

 

दरम्यान, गंभीरेने अनेक लोकांकडून पैसे घेतले असून ते परत केले नाहीत, हे कळल्यावर कुटुंबाला धक्का बसला. पीडितेने तिच्या पैशांची मागणी केली असता, गंभीरे आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा नंबर ब्लॉक केला. गंभीरे अचानक शहर सोडून गेला आणि त्याने आपला मोबाईल बंद केल्याचे पीडितेने सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

गाडी वळविण्याच्या शुल्लक कारणावरून लोणावळ्यात पर्यटकाचा खून, 9 जणांनी लोखंडी रॉडने केली होती मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.