Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : वडगाव रासाई येथे बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला! दोघांविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 12:01

अक्षय टेमगिरे
Shirur News शिरूर , ता. ८ : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई-शेलारवाडी येथे शेताच्या बांधाच्या वादाने पुन्हा हिंसक रूप धारण केले असून शेतकऱ्यावर काठी, दगड आणि लोखंडी खोऱ्याच्या दांड्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय बाळासाहेब शेलार (वय ३८, व्यवसाय शेती, रा. वडगाव रासाई-शेलारवाडी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी काकासो बाबुराव शेलार आणि अक्षय काकासो शेलार (दोघे रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. Shirur News

 

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास धनंजय शेलार हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारील बांधकरी अक्षय शेलार याने बांध सरळ करण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही वेळातच हा वाद थेट मारहाणीत बदलला. काकासो शेलार हा शेतात आला आणि शिवीगाळ करत धनंजय शेलार यांना खाली ढकलून काठीने मारहाण करू लागला. त्यानंतर अक्षय शेलार याने लोखंडी खोऱ्याच्या दांड्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात धनंजय शेलार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. Shirur News

यावेळी आरोपींनी “बांध सरळ करून दिला नाही तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या धनंजय शेलार यांना नातेवाईकांनी तातडीने मांडवगण पोलीस चौकीत आणले. त्यानंतर मांडवगण आणि न्हावरा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्यातचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47
Next Post
Complaint file against so called journalist in uruli kanchan pune

Uruli Kanchan News : शेतीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोघेजण जखमी, सहाजणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.