Pune Crime : पुणे : पुणे शहारातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका 41 वर्षीय जावयाने सासरकडून होणाऱ्या त्रासातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. जावायाने पत्नी,सासू,सासरे, मेव्हणा आणि अन्य एक या चार जणांकडून होणाऱ्या मानसिक त्रासातून जावायाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. (Tired of father-in-law’s troubles, suicide in Pune; Inclusion of wife’s name in suicide note)
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
अभय गवळी वय 41 असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. (Pune Crime) पत्नी , सासू ,सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे आणि अन्य एक या पाच जणांविरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवळी यांचा विवाह जानेवारी 2014 मध्ये झाला होता. ते दोघे पती पत्नी शेवाळेवाडी येथील भडलकरनगर येथे राहण्यास होते. (Pune Crime) अभय आणि पत्नी या दोघांचा विवाह झाल्यापासून सासू , सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे हे अभय यांच्या संसारात ढवळाढवळ करीत होते.(Pune Crime) तसेच पत्नी या आई,वडीलांचे ऐकत होत्या.यावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले. या सर्व सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अभय गवळी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये पत्नीसह सासरकडील चार जण मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक; वानवडी पोलीसांची कामगिरी
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना
Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या