Pune Crime | पुणे : आळंदी येथे लग्नाचा बनाव रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सदर प्रकार हा ५ एप्रिल ते १७ एप्रिल २०२३ दरम्यान घडला आहे.
नितेश वसंता चव्हाण (वय ३०, रा. कानडी, मुर्तिजापूर जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत १६ वर्षाच्या मुलीच्या आईने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर आरोपीने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. व १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करतो, असे आरोपीने पिडीतेला सांगून आळंदीत नेऊन लग्नाचा बनाव केला. परंतु आरोपीने पिडीतेला वर्धा येथील एका शेतातील खोलीत ठेवले. तेथे तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध ठेवले.
दरम्यान, याप्रकरणी पिडीतेच्या ईने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी नितेशला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चौधरी करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला