Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : पुण्यात ‘टाटा पंच’कार ६ दुचाकी, रिक्षाला उडवत थेट दुकानात घुसली, अपघातात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 May 2026, 11:41
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Accident पुणे, ता. १७ : पुण्यातील खडकवासला परिसरात शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला असून, भरधाव वेगातील कारने तब्बल सहा दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातात चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन ते चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. Pune Accident

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २५ बीएच ६४८९ क्रमांकाची ‘टाटा पंच’ कार खडकवासला धरणाच्या दिशेने जात होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या सहा दुचाकींसह एका रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अनेक वाहने अक्षरशः चुराडा झाली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या दुकानात घुसली. Pune Accident

या अपघातात यशराज निलेश कांबळे या चार वर्षीय चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने सिंहगड रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Pune Accident

अपघातात अन्य काही नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी चालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. Pune Accident

 

दरम्यान, पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे याला ताब्यात घेतले असून, त्याचा मित्र प्रकाश तात्याराम कोठारे यालाही चौकशीसाठी पकडण्यात आले आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Pune Accident

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं 75व्या वर्षी निधन,सिनेसृष्टीला मोठा धक्का..

Thursday, 8 October 2026, 7:55

पावसाला ब्रेक, उन्हाचा कहर सुरु!महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट ‘ची एन्ट्री ;’या ‘जिल्ह्याना इशारा

Thursday, 8 October 2026, 7:44

गुरुवारी ग्रहांची खास कृपा! राशींचं नशीब पालटणार; पैसा, करिअर अन् यशाची बरसात, राशीभविष्य जाणून घ्या…

Thursday, 8 October 2026, 7:19

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58
Next Post

Monsoon News : मॉन्सूनचे अंदमानात दमदार आगमन , केरळात मॉन्सून २६ मेपर्यंत धडकणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp