Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका! गांजा विक्री करणारी महिला जेरबंद तर तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हे

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 31 July 2026, 11:18

लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहारावर पोलिसांनी मोठा आघात केला आहे. अवघ्या चार दिवसांत लोणी काळभोर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सलग चार स्वतंत्र कारवाया करत गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेसह सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या घटकांचे धाबे दणाणले आहेत.

सुनिता संतोष भाले (वय ३४),आदित्य रामदास मेमाणे (वय १९) सागर भगवान ऊफाडे (वय ३१) व अगस्ती बबन भारती (वय ४५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांकडूनही या कारवायांचे स्वागत होत असून, अशाच प्रकारे सातत्याने धडक मोहीम राबवून अमली पदार्थांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर परिसरात सर्वात मोठी कारवाई २९ जुलै रोजी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सुनिता संतोष भाले (वय ३४) हिला ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेला ६७८ ग्रॅम गांजा, अंदाजे ४० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

 

दरम्यान, ३० जुलै रोजी पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ कारवाई करत आदित्य रामदास मेमाणे (वय १९) याला गांजायुक्त सिगारेट (रिजला पेपर) ओढताना रंगेहात पकडले. त्याच्याकडील गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

यापूर्वी २८ जुलै रोजी लोणी स्टेशन परिसरातील आशीर्वाद हॉटेलजवळ सागर भगवान ऊफाडे (वय ३१) हा चिलीममध्ये गांजा भरून सेवन करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच दिवशी लोणी गावातील बाजारतळ परिसरात अगस्ती बबन भारती (वय ४५) यालाही गांजा ओढताना पकडण्यात आले. दोघांविरुद्धही एनडीपीएस कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून गांजा सेवनासाठी वापरलेली चिलीम व साहित्य पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अचानक खालावली अभिजीत दिपके यांची तब्येत; डॉक्टरांचं पथक घरी दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 1 August 2026, 13:30

धावत्या टँकरने अचानक घेतला पेट! काही मिनिटांतच घडलं भयंकर, इंदापूर येथील घटना

Saturday, 1 August 2026, 13:16

शाळकरी बहिणींचा 8 दिवस पाठलाग… अखेर रस्ता अडवून केलं भयंकर कृत्य; पुण्यातील घटना

Saturday, 1 August 2026, 13:10

रोहित-गिलसोबत शमी-भुवीही टीममध्ये? 2027 वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी टीम; ‘या’ 15 खेळाडूंच्या नावांची जोरदार चर्चा

Saturday, 1 August 2026, 12:01

अमित शाह पुण्यात दाखल होताच राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 1 August 2026, 11:34

“मी ट्रेनने घरी येतेय, पुणे स्टेशनवर घ्यायला या…” 75 वर्षीय आजीचा शेवटचा फोन; त्यानंतर अचानक बेपत्ता

Saturday, 1 August 2026, 10:41
Next Post

"जमिनीचे कागदपत्रे दे" म्हणत घरात घुसून महिलेला मारहाण! यवत पोलिसांत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.