Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मी ट्रेनने घरी येतेय, पुणे स्टेशनवर घ्यायला या…” 75 वर्षीय आजीचा शेवटचा फोन; त्यानंतर अचानक बेपत्ता

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 1 August 2026, 10:41

उरुळी कांचन, (पुणे) : मुंबई येथील वज्रेश्वरी आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिला पुण्यावरून उरुळी कांचन येथे घरी परतत असताना अचानक बेपत्ता (मिसिंग) झाल्याची घटना समोर आली आहे. “मी पुणे रेल्वे स्टेशनवर असून उरुळी कांचनला येणाऱ्या ट्रेनने घरी येत आहे, मला घ्यायला स्थानकावर या,” असा फोन त्यांनी नातसुनेला केला होता; मात्र त्यानंतर त्या घरी पोहोचल्याच नाहीत आणि त्यांचा मोबाईलही बंद लागत आहे.

मंडाबाई बापू गडदे (वय-75, रा. धायगुडेवस्ती, खामगाव टेक, ता. हवेली) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तात्याराम बापू गडदे (वय 50, व्यवसाय- शेती, रा. धायगुडेवस्ती, खामगाव टेक, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव टेक येथील मंडाबाई बापू गडदे या 28 जुलै 2026 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवरून मुंबई येथे वज्रेश्वरी आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. दर्शन घेऊन त्या 30 जुलै रोजी सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यापर्यंत परत आल्या.

 

त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून आपली नातसून प्रणाली गडदे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. “मी सध्या पुणे रेल्वे स्टेशनला आहे, उरुळी कांचनला येणाऱ्या रेल्वेने घरी येते, मला घेण्यासाठी स्टेशनला या,” असे सांगून त्यांनी फोन ठेवला. फोन आल्यानंतर कुटुंबीयांनी उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर त्यांची वाट पाहिली, मात्र बऱ्याच वेळानंतरही मंडाबाई घरी आल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन सतत बंद लागत होता.

दरम्यान, नातेवाईकांकडे विचारपूस करून आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊनही त्यांचा काहीच सुगावा न लागल्याने, अखेर शुक्रवारी (ता. 31) कुटुंबीयांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखी मोदी-शाहांची जोडी”; पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Saturday, 1 August 2026, 14:07

अचानक खालावली अभिजीत दिपके यांची तब्येत; डॉक्टरांचं पथक घरी दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 1 August 2026, 13:30

धावत्या टँकरने अचानक घेतला पेट! काही मिनिटांतच घडलं भयंकर, इंदापूर येथील घटना

Saturday, 1 August 2026, 13:16

शाळकरी बहिणींचा 8 दिवस पाठलाग… अखेर रस्ता अडवून केलं भयंकर कृत्य; पुण्यातील घटना

Saturday, 1 August 2026, 13:10

रोहित-गिलसोबत शमी-भुवीही टीममध्ये? 2027 वर्ल्ड कपसाठी भारताची तगडी टीम; ‘या’ 15 खेळाडूंच्या नावांची जोरदार चर्चा

Saturday, 1 August 2026, 12:01

अमित शाह पुण्यात दाखल होताच राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 1 August 2026, 11:34
Next Post

अमित शाह पुण्यात दाखल होताच राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.