Loni Kalbhor News : फ्रुटीतून गुंगीचे औषध देऊन नोकरदार महिलेवर एका कथित पत्रकाराने जबरदस्तीने बलात्कार केला. आणि त्या क्षणांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली 3 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कथित पत्रकाराच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत राजकुमार सुरवसे (वय-29, रा. माळीमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे) (Loni Kalbhor News) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय नोकरदार महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या लोणी काळभोर परिसरात नोकरी करतात. पिडीता व हनुमंत सुरवसे हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पिडीता यांनी कानिफ जगदाळे याला हातउसने पैसे दिले होते. परंतु,कानिफ जगदाळे हा पिडीता यांना पैसे परत करत नव्हता. कानिफ जगदाळे यांस उसने दिलेले पैसे काढुन देतो असे सांगुन कथित पत्रकार हनुमंत सुरवसे याने पिडीतेला गाडीमध्ये बसविले. गाडीमध्ये बसविल्यानंतर फ्रुटी पिण्यास दिली.
हनुमंत सुरवसे याने फ्रुटीमध्ये काहीतरी गुंगीकारक औषध देऊन पिडीता यांना थेऊर येथील वृदांवन लॉज मध्ये घेऊन गेला. त्यानंतर सुरवसे याने पिडीतेवर बलात्कार केला. तसेच जबदरस्तीने पिडीतेचे कपडे काढुन मोबाईलमध्ये विवस्त्र फोटो काढले. सदर प्रकार हा 3 मे 2025 रोजी रात्री नऊ ते 4 मे 2025 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
दरम्यान, हनुमंत सुरवसे याने त्या क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीतेकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. व सुरवसे यांने सुरवातीला पिडीतेकडून 32 हजार रुपये घेतले होते व उर्वरीत पैसे न दिल्याने पीडीतेची उघडे फोटो, व्हिडिओ व रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तु याबाबत कोणाला काही सांगीतले तर तुला आमच्या बायका आणून मारत पोलीस स्टेशन येथे घेऊन जाईल. अशी धमकी दिली.
याप्रकरणी 41 वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत सुरवसे याच्यावर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 64,308 (1) (2),123 व 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.






