Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : केक खाली पडल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री घरात घुसून हल्ला ; तरुणावर कोयत्याने वार, आजोबांचा हात फ्रॅक्चर तर आजीलाही बेदम मारहाण..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 22 November 2026, 11:03

लोणी काळभोर : मित्राच्या वाढदिवसाला केक खाली पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून कुटुंबावर हल्ला केला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील फुलेवस्ती, सिद्राममळा परिसरात ही घटना शनिवारी (ता. 21) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात 19 वर्षीय तरुणाच्या चेहऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला, तर त्याच्या आजोबांचा हात फ्रॅक्चर करून आजीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदित्य रामदास मेमाणे (वय-19), आजोबा सुरेश गुलाब मेमाणे वय 70, आजी शारदा सुरेश मेमाणे वय 63, असे मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. तर रोहन आजीनाथ लोंढे (वय अंदाजे 26, रा. लोणी काळभोर ता. हवेली, व त्याचे इतर तीन साथीदार (नाव पत्ता माहीती नाही) असे मारहाण करणाऱ्या चौघांची नावे आहेत. याबाबत आदित्य मेमाणे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य मेमाणे याचे फुरसुंगी येथील जत्रा होटेल समोर पानटपरी असुन तो व्यवसाय करून मिळणा-या उत्पन्नातुन उदरनिर्वाह चालवतो. शुक्रवारी (ता. 20) रात्री नऊच्या सुमारास मित्र युवराज महानवर याच्या वाढदिवसानिमित्त लोणी कॉर्नर स्मशानभूमीजवळ मित्र जमले होते. यावेळी आदित्य याच्याकडून केक खाली पडल्याच्या कारणावरून आदित्य आणि रोहन आजीनाथ लोंढे (वय अंदाजे-26) यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला आणि आदित्यला घरी सोडले. मात्र, त्यानंतरही रोहनने आदित्यच्या आजीच्या मोबाइलवर फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

शनिवारी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान रोहन आणि त्याचे तीन साथीदार आदित्यच्या घरात घुसले. घराचा दरवाजा लाथा मारून तोडण्यात आला. आरोपींनी आदित्यला शोधत घरात प्रवेश केला. रोहनने ‘आज तुला जिवंत सोडणार नाही, तुझा गेम करतो’ अशी धमकी देत कोयत्याने आदित्यच्या चेहऱ्यावर वार केला. त्यामध्ये उजव्या डोळ्याच्या वर गंभीर जखम झाली. इतर साथीदारांनी तांब्याच्या हांड्या आणि दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नातवाला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या आजोबा सुरेश मेमाणे यांना आरोपींनी ढकलून कोपऱ्यात पाडले आणि दगडी खलबत्त्याने मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात मोडला. आजी शारदा मेमाणे यांनाही पाठीवर, छातीवर आणि डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

दरम्यान, शेजारी जमा होण्याच्या भीतीने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. शेजाऱ्यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले. रोहन लोंढे आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध जिवे मारण्याच्या प्रयत्नाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : केक खाली पडल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री घरात घुसून हल्ला ; तरुणावर कोयत्याने वार, आजोबांचा हात फ्रॅक्चर तर आजीलाही बेदम मारहाण..

Sunday, 22 November 2026, 11:03

पुण्यात टोळक्याची थरारक दहशत! खराडीत दोघांचं दुचाकीवरून अपहरण; मैदानात नेऊन 9 जणांकडून अमानुष कृत्य..

Sunday, 22 November 2026, 10:35

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ थेट 90 मिनिटांवर! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा मेगा प्लॅन तयार; बेंगळुरूचा प्रवासही होणार सुपरफास्ट!पुणे :

Sunday, 22 November 2026, 10:02

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp