Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ३०) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. Loni Kalbhor News

अल्पेश जितेंद्र वजानी (वय-४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात हिंद कॉम्प्लेक्सच्या शेजारी गणेश पापरिकर राहतात. यांच्या वसाहतीत अल्पेश वजनी याने मागील दोन दिवसांपूर्वीच सदनिका भाडेतत्वार घेतली होती. सदनिकेत कोणी नसताना अल्पेश वजानी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सदनिका भाडेतत्वार घेऊन त्या सदनिकेत अल्पेश वजानी याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून लोणी काळभोर पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.







