Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सात वर्षीय मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मावळमध्ये उत्स्फुर्त बंद, नागरीकांचा निषेध मोर्चा…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 August 2022, 19:56

पुणे : कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ पवन मावळात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांकडून व सामाजिक संस्थेकडून घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मावळ मधील नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. उत्स्फुर्तपणे शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

या प्रकरणी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय-२४) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात खून, अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कामशेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तेजस हा अविवाहित असून तो पवना नगर परिसरातील एका बंगल्यावर केअर टेकर म्हणून काम करतो आहे. त्याला मंगळवारी सुट्टी होती. मद्यपान केलेल्या तेजसने सात वर्षाच्या मुलीचे घरासमोरूनच अपहरण केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि मग तिचा खून केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबाबरोबर अवघं गाव तिचा शोध घेत होतं. उशिरा पर्यंत शोध न लागल्याने याबाबत कामशेत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तिथून जाणाऱ्या गाड्यांबाबत देखील चौकशी करण्यात आली.

दरम्यान, बुधवारी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या गवतात मुलीचा मृतदेह आढळला. घटनास्थळाच्या परिसरात तेव्हा काही तरुण असल्याचं समोर आलं. त्यातून आरोपी तेजसचं नाव पुढे आलं. कामशेत पोलिसांनी तेजसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करत नागरीकांनी मोर्चा काढला.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49
Next Post

सावरणाऱ्या हाताला अखेरची ' वंदना'...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp