Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन परिसरातील पेट्रोल पंपावर चालत होती वीजचोरी ; महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकून व्यावसायिकाला दिले तब्बल २० लाखाचे बिल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 December 2022, 13:16

विशाल कदम

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील एका पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी वीजचोरी करीत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महावितरणच्या भरारी पथकाने नोव्हेंबर महिन्यात धाड टाकून व्यावसायिकाला वीजचोरीचे तब्बल २० लाखाचे बील देण्यात आले आहे.सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकुन बायपास करून वीजचोरी करण्याची तरतुद केली होती. ग्राहकास ९० हजार १७९ युनिटचे बील दिले आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांची १७५ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली असून यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.उघडकीस आणलेल्या वीज चोरीमध्ये मोठया प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यात 4 प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

पहिल्या घटनेत उरुळीकांचन परिसरात रात्रीच्यावेळी भरारी पथकाने धाड टाकुन पेट्रोल पंपाची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकुन बायपास करून वीजचोरी करण्याची तरतुद केलेली होती. ग्राहकास ९० हजार १७९ युनिटचे रू. १९ लाख ४२ हजार १८२ रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

दुसऱ्या प्रकरणात पुणे शहर भागातील ८० केडब्ल्यु जोडभार असलेल्या व्यावसायिक ग्राहकाची वीजचोरी पकडण्यात आली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरच्या आधी एल.टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केलेली होती. सदर ग्राहकानी ८०  हजार ४३८ युनिटसची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना २८ लाख १४ हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

तिसऱ्या प्रकरणात कोल्हापुर मधील इचलकरंजी भागातील ९१ एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले व ९०  हजार २०८ युनिटस् चोरी केल्यामुळे त्यांना १५ लाख २१ हजार ७१०. रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

चौथ्या प्रकरणात सोलापुर मधील नातेपुते भागातील 60 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने दुसऱ्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरून एल.टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे त्यांना 69 हजार 555 युनिट्सची वीज चोरी केल्यामुळे 11 लाख 55 हजार 300 रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

सदर वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून विहित कालावधीत या ग्राहकांनी वीजबिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरूध्द विद्युत अधिनियम – 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना सश्रम कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

दरम्यान, आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी दिले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उप संचालक सुमित कुमार हे पुणे प्रादेशिक विभागातील वीज चोरांवर कडक पाळत ठेवत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

लोणी काळभोर येथील राजलक्ष्मी कार्यालयासमोर चार वाहनांचा विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनांचे नुकसान !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.