Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील राजलक्ष्मी कार्यालयासमोर चार वाहनांचा विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनांचे नुकसान !

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 December 2022, 16:18

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी, दुचाकी आणि कंटेनर या चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची  धक्कादायक घटना लोणी काळभोर(ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्तीच्या परिसरात राजलक्ष्मी कार्यालयासमोर रविवारी (ता.११) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.

रमजान गुलाब शेख (वय-५०, नोकरी-शिक्षक, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), आकांक्षा भोसले (वय- माहिती नाही. रा. उरुळी कांचन, ता. हवेली), सुनील भुजबळ (माहिती नाही रा. लोणी काळभोर, ता. हवेली) व अन्य एक ( नाव समजू शकले नाही) यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमजान शेख हे त्यांच्या पत्नीसोबत हडपसर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी चालले होते. तर आकांक्षा भोसले या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त चालल्या होत्या. दोन्ही गाड्या पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने एका पाठोपाठ चालल्या होत्या.

 

आकांक्षा भोसले या गाडी चालवीत असताना, त्यांची गाडी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्तीच्या परिसरात राजलक्ष्मी कार्यालयाच्यासमोर आली असता, आकांक्षा ओव्हरटेक करीत असताना, त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला आणि रमजान शेख यांच्या गाडीला अचानक समोर आल्याने दोन्ही गाड्यांची ठोसर बसून एकमेकांमध्ये अडकल्या.

त्यानंतर दोन्ही गाड्या रस्त्याचा दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्या. व रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या दुचाकी आणि कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनील भुजबळ यांची दुचाकी चक्काचूर झाली आहे.

दरम्यान, हा अपघात इतका विचित्र होता कि, पुण्याच्या दिशेने जाताना दोन कारचा अपघात झाला दोन्ही कार एकमेकांत अडकल्याने रस्त्याचा दुभाजक ओलांडून सोलापूर कडील रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी व कंटेनरला धडक दिली. मात्र सुदैवाने यावेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाताना एकही वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्याची सुरक्षा वाऱ्यावरच…
पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावलेले आहेत.

लोणी काळभोर ते उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्टया, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी बुद्रुक येथे रक्तदान शिबिरासाठी ग्रामस्थांचा प्रतिसाद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.