अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर रोडवर निर्जन ठिकाणी दोन अनोळखी चोरट्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून आठ प्रवाशांना लुटले. या घटनेत 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राम बाबासाहेब तायनाक वय 20, रा. कानड, ता. शेलु, जि. परभणी हे आपल्या नातेवाईकांसह मावशीच्या मुलाची तब्येत विचारपूस करण्यासाठी आर्टिक कार MH 14 HN 9909 ही कार भाड्याने घेऊन पुणे-भुगाव येथे जात होते.
कार चालक गणेश मदन खडसे यांनी रांजणगाव गणपती मंदिराजवळ लघुशंकेसाठी कार थांबली असता, मागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी कारजवळ येऊन चालकाच्या गळ्याला चाकू लावला. त्याचबरोबर महिलांना कोयता दाखवत त्यांच्याकडील मंगळसूत्र व कर्णफुले असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेले आहे. अज्ञात चोरट्यांनी ‘इथे थांबू नका, नाहीतर जीवे मारून टाकू’ अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले आहे.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास थोरात हे करत आहे.






