पुणे : नोकरीला लावतो म्हणून राजेवाडी (ता. आंबेगाव) येथील दोन तरुणांची अडीच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामटया भोंदूबाबास घोडेगाव पोलीसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.
महंत 108 श्री स्वामी रामानंदजी महाराज, तथा श्री विनायक पांडुरंग उईके, (रा श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम, श्री क्षेत्र चांधणी बर्डी, पोस्ट खराडी ता नरखेडा जि नागपुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महंत बेलनाथ महाराज गोरक्षनाथ आश्रम कमलजामाता मंदीर राजेवाडी, (वय- ५९, धंदा- देवसाधना व किर्तन-प्रवचन, रा राजेवाडी ता. आंबेगाव) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत 108 श्री स्वामी रामानंदजी महाराज व त्यांच्या एका साथीदाराने नोकरीस लावतो असे आमिष विनायक उईके यांनी दाखवले होते. त्यानुसार दोघांनीही आरोपी विनायक उईके याला दोघांनी मिळून २ लाख ५१ हजार रुपये दिले. मात्र खूप दिवस होऊनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे समजले त्यानुसार घोडेगाव पोलीस ठाण्यात स्वामी रामानंदजी महाराज यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीस नागपूर येथून अटक केली आहे.
सदर गुन्ह्याची कामगिरी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उप निरीक्षक अनिल चव्हाण पोलीस हवालदार निलेश तळपे, सोमनाथ होले यांनी केली आहे.