Big Breaking पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या संतापजनक प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी आरोपीला ऑनलाइन पद्धतीने पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला १४ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. Big Breaking
या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, आरोपीविरोधात संतापाची लाट उसळली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला पोलिसांकडून कोणताही त्रास देण्यात आला आहे का, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने “नाही” असे उत्तर दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलिस कोठडी वाढवली. Big Breaking

दरम्यान, १ मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा सुन्न झाला होता. घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगून गोठ्यात नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचत हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
दुपारपासून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळाने गोठ्यात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसून आला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. Big Breaking
या घटनेनंतर नसरापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. Big Breaking





