Bhigvan News : भिगवण, (पुणे) : अंगणात वाळत घातलेल्या कपड्यांमधून पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी, एका 46 वर्षीय व्यक्तीवर दबा धरून बसलेल्या चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना भिगवण येथे घडली आहे. या हल्ल्यात एकजण गंभीर झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हि घटना रविवारी (ता. 26) रात्री पावणे नऊच्या सुमारास भिगवण हद्दीत घडली. Bhigvan News

धनाजी उर्फ गणेश तुकाराम जमदाडे (वय-46) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विक्रम बाळासो माडगे, त्यांची पत्नी रूपाली माडगे तसेच दोन अनोळखी इसम अशा एकूण चौघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bhigvan News
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जमदाडे यांच्या कुटुंबीयांनी अंगणात कपडे वाळत घातले होते. या कपड्यांमधून गळणारे पाणी आरोपींच्या अंगावर पडल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला होता. हा किरकोळ वाद मिटल्याचे वाटत असतानाच, आरोपींनी मात्र मनात सूडभावना ठेवली होती. Bhigvan News
26 एप्रिल 2026 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास जमदाडे हे किराणा दुकानात सामान घेण्यासाठी थांबले होते. यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या विक्रम माडगे, त्याची पत्नी रूपाली माडगे आणि इतर दोन अनोळखी साथीदारांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि कोयत्याने जमदाडे यांच्या डोक्यावर आणि शरीरावर सपासप वार केले. Bhigvan News
या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी जखमी जमदाडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी वरील चौघांवर भारतीय न्याय संहिता (BNS), शस्त्र कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. भिगवण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. Bhigvan News




