उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. २६) भरदुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.
अनिल ज्ञानदेव म्हेत्रे असे घरावर दरोडा टाकलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दरोड्यात अज्ञात ३ पुरुष व एका महिलेचा समावेश असून चाकूच्या धाक दाखवून भरदिवसा अनिल म्हेत्रे यांच्या घरात जाऊन लुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास म्हेत्रे यांच्या घरात चोरट्यांनी घरात शिरून गॅस पेटवून त्यावर चाकू गरम केला व घरातील महीलेला चाकूने चटके दिल्याचा जबाब यवत पोलिसांना दिला असल्याने यवत पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. घटना नेमकी कशी घडली याबाबत प्राथमिक तपास सुरु आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..