Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुढचे 72 तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; ‘या’ जिल्ह्यांनी राहा सावध

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 29 July 2026, 7:53

Weather News: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केले असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलै दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो.

पुणे शहराचे हवामान

पुणे शहर आणि घाट परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने पुढील तीन दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः घाट परिसरात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून सखल भागात पाण्याचे साचणे टाळण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

विदर्भात पावसाचा हाहाकार, शाळांना सुट्टी जाहीर

विशेषतः विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. नागपूर शहरात गेल्या काही तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी ३ दिवसांचे हवामान अंदाज

  • ३० जुलै: या दिवशी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो.

  • ३१ जुलै: यादरम्यान खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते तसेच घाट परिसरात दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

इराणने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेला थेट आव्हान, परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp