Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘अक्वान’ चक्रीवादळाचा रौद्र अवतार! महाराष्ट्रात पावसाचे सावट; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 November 2026, 8:43

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असल्याने अनेक राज्यांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा यांसह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. महाराष्ट्रातील विदर्भातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ उत्तर दिशेने सरकत असून ओडिशातील गोपाळपूरजवळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. नरसापूर ते पुरी या किनारपट्टीच्या परिसरात वादळाचा प्रभाव जाणवू शकतो. किनाऱ्यावर पोहोचताना वाऱ्यांचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, रायलसीमा आणि मध्य प्रदेशातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या, तर काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही तापमानात चढ-उतार सुरू आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असताना राज्यातील काही शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. धुळे येथे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये 11.4, गोंदियात 12.2, जेऊरमध्ये 12.5, जळगावमध्ये 12.6, तर वर्धा येथे 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी थंडी, तर विदर्भात पावसाचे सावट असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली; बोर्डाकडून नवे वेळापत्रक जाहीर, परीक्षेपूर्वी नक्की वाचा..

Friday, 20 November 2026, 10:21

सोशल मीडियावर ओळख अन् पुण्यात गुप्त भेट; पोलिसांनी रंगेहाथ पकडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Friday, 20 November 2026, 8:53

‘अक्वान’ चक्रीवादळाचा रौद्र अवतार! महाराष्ट्रात पावसाचे सावट; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 20 November 2026, 8:43

बदली नको म्हणून अपील करणाऱ्या शिक्षकांना दणका! सरकारने लागू केला नवा नियम

Friday, 20 November 2026, 8:37

उपचारानंतर शरद पवार पुन्हा मैदानात; ओतूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात लावणार हजेरी

Friday, 20 November 2026, 8:26

Ind vs NZ 1st Test: न्यूझीलंडचे 5 फलंदाज स्वस्तात बाद, मग फिलिप्सने ठोकले शतक! भारतासमोर 368 धावांचे आव्हान

Friday, 20 November 2026, 8:19
Next Post

सोशल मीडियावर ओळख अन् पुण्यात गुप्त भेट; पोलिसांनी रंगेहाथ पकडताच समोर आला धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp